नवीन लेखन...

तशी ती सॉलिड आहे.. (कथा)

तशी ती सॉलिड आहे ,
सगळ्यांना माहित आहे हे ,
तसे तिलाही माहीत आहे.
पण मला ती फार उशीरा खरी कळली .
वास्तविक पहाता माझी तिची ओळख फारच थोड्या महिन्याची.
दिसायला खास नाही , चारचौघीसारखी.
एक स्त्री म्हणून उत्तम.
मैत्रीण म्हणून देखील
बाकी काही सागायला नको.
कारण समजाणऱ्याला सहज समजते न सांगता.
तिची बॅड हॅबिट .
ती सिगरेट वगैरे मामुली पीत नसे.
चक्क विडी पिते.
हे मला जेव्हा कळले म्हणजे तिच्या घरी गेलो असताना तिने विडीचे बंडल पर्समधून काढले तेव्हा मी कंप्लिट फ्लॅट.
विडी पेटवताना म्हणाली.
विडी एकदम कडक.
सिगरेट बिग्रेट मला आवडत नाही .
त्यात काही मजा नसते.
तू आणि विडी .
मी म्हणालो.
तेव्हा ती म्हणाली. अरे मी सिव्हिल इंजिनिअर , बरीच वर्षे साईटवर काढली आहेत
तेव्हा जंगलात सिगरेट मिळत नसे. आमचे कामगार विडी ओढत.
बघीतली एकदा एका बाईकडे मागितली ..ओढली आणि मजबूत किक बसली.
मग ती मला चिकटली ती चिकटली.
नवरा बोबलात नाही का ? मी म्हणालो
नवरा काय बोबलणार तो सिगार पितो.
माझा बाप आहे तो या बाबतीत
तो फारसा इथे नसतो. जर्मनीला असतो .
त्याच्या सिगारच्या वासात माझा विडीचा वास मरतो ?
तुला माहीत आहे , आम्ही एकदा पार्टीमध्ये मैत्रिणी खूप प्यालो होतो
आणि तुझ्या तोंडाला वास येतो का म्हणून एकमेकांच्या तोंडाचा वास घेतला.
आयला दोघांनाही वास आला नाही.
कारण दोघेही फुल टू .
मी सभ्य प्रश्न विचारला ,
तुला काही वाटत नाही का हे विडी वगैरे.
ती हसत म्हणाली , अरे बंधने मी कधी घालून घेतली नाहीत.
..आणि कुणावर बंधने घातली नाहीत.
तू मात्र मला सोडून त्यावेळी गेलास कॉलेजमध्ये असताना.
माझे प्रॉब्लेम झाले होते.
घराची जबाबदारी आली होती करणारा काय ..
मी म्हणालो.
ठीक आहे मला कळले नंतर आता ठीक आहे ना .
ती म्हणाली…
हो आहे ठीक ..
एकटाच रहातो ..
नाही पटत आम्हा दोघांचे …
मुलगा ऍब्रॉड असतो.
आम्ही खूप गप्पा मारल्या ड्रिंक्स घेतली.
जायला निघालो …म्हणाली येत जा …
काहीतरी चांगले घडेल तुझ्या आयुष्यात …
आणि खळखळून हसली…
त्या तिच्या जुन्या खळखळून हसण्यामुळे
म्हणालो ..
येस , व्हाय नॉट
आज घरी येताना खूप मोकळे वाटतं होते…
व्हॅक्युम निघायच्या
मार्गावर होता..
असे जाणवले….

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..