नवीन लेखन...

तत्त्वांशी बांधिलकी 

२००७ च्या ऑगस्ट महिन्यात पोहनकर फाऊंडेशनतर्फे आयोजित अकोल्यातील एका शाळेत यशोगाथा ही माझी कार्यशाळा प्रारंभ होण्याच्या बेतात असताना मला निरोप मिळाला की माझ्या एका जुन्या मित्राला या कार्यशाळेत काही वेळ उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मित्राचं नाव कळताच माझ्या मनाने क्षणार्धात ३३ वर्षांपूर्वीच्या कॉलेजच्या सुंदर दिवसांकडे झेप घेतली.

१९७४ ते १९७६ ही दोन वर्षे अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात आम्ही एकाच होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी होतो. तो चंद्रपूरचा तर मी नागपूरचा. मी कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (पोस्ट ग्रॅजुएशन) घेत होतो व तो पशुवैद्यकशास्त्राचा विद्यार्थी होता. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून आले असल्यामुळे शिक्षण घेण्याबरोबरच होस्टेल लाइफ भरपूर एन्जॉय करण्याकडे त्यांचा कल असायचा. तत्त्वांशी, विचारांशी बांधिलकी कशाशी खातात हे जिथे कोणाच्या गावीही असण्याची शक्यता नव्हती अशा वातावरणात तो त्याच्या वेगळेपणाने उठून दिसायचा आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहून गेला होता. शिक्षण घेण्यापेक्षा त्याचा बहुतांश वेळ एका संघटनेचं काम करण्यात जात असे. त्याची लक्षणं बघून हा शिक्षण पूर्ण करू शकेल की नाही याबद्दल मला शंका येत असे व ती लवकरच खरीही ठरली. १९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता.

मित्रांनो, त्या संघटनेचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या माझ्या अभिमानास्पद मित्राला आपला देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.(डॉ.) मोहनजी भागवत या नावाने ओळखतो !

श्रीकांत पोहनकर 
98226 98100 
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..