शक्यता अजिबात का नाही ?
देव अस्तित्वात का नाही ?
मोकळा असतो बर्यापैकी
वेळ जाता जात का नाही !
चांगली ही, छान तीही पण..
पण तरी ती बात का नाही ?
काय आपण बोललो होतो
हे तुझ्या लक्षात का नाही ?
लागला बाजार सौख्यांचा
एकही स्वस्तात का नाही ?
पिंजर्याच्या आतला पक्षी
खात किंवा गात का नाही ?
एवढे उपकार कर बाबा
हे तुझ्या हातात का नाही
— ॐकार जोशी
(९ डिसेंबर २०१८)
Leave a Reply