खरे तर तिचे लग्न
जबरदस्तीने झाले होते..
प्रेमाची शक्यताच नव्हती
त्याला हे माहीतच नव्हते..
पण तिला हवा तसा तो नव्हता
नवरा म्हणून तिची काही स्वप्ने होती
खरे तर तो खूपच चांगला होता…
पण तिच्या स्वप्नाप्रमाणे नव्हता..
हीच तिची चूक तिला
भोवणार होती..
नाही भोवलीच..
प्रेमाचे नाते तिने दिसण्याशी बांधले…
दोघांमध्ये वेगळीच घुसमट होती..
उपाय होता..नीट राहण्याचा
पण तिच्याकडून ते कधीच
झाले नाही…
तो मात्र मंगळसूत्राप्रमाणे
आयुष्यभर
लटकत राहिला
प्रमाणिकपणे……..
सतीश चाफेकर.
Leave a Reply