ती त्या दिवशी माझा
नंबर घेऊन गेली ती गेलीच.
मी पण विसरून गेलो,
म्हणा अशा अनेक भेटतात ..
त्यावेळी किंवा एकदोन दिवस
अस्थिरपणा किंवा
पोकळी जाणवते मग
गाडी रुळावर येते.
अचानक आज सकाळी
तिचा फोन आला.
आज संध्याकाळी त्याच
हॉटेलमध्ये भेटू.
मी ऑफिस ‘ ऍडजेस्ट ‘ केले.
,..समोर ती बसली होती.
आज वेगळे गाणे लागले होते,
ते भूपेंद्र आशा भोसले यांचे…. इंतजार ..नाही
खरे तर आज माझे
त्या गाण्याकडे लक्षच नव्हते.
ऑर्डर दिली, गप्पा सुरु झाल्या.
आज ती खरेच सॉलिड दिसत होती.
आम्ही कॉलेजचे दिवस,
त्यावेळी जे जे काही घडले होते
मित्र मैत्रिणीच्या बाबतीत
गप्पा मारत होतो.
जशा गप्पा वाढत होत्या
तसतशी ती मला खूप आकर्षक
वाटू लागली होती.
पण,
साल काही हाताला लागतच नव्हते
इतक्यात म्हणाली ..
आपण लग्न केले तर.
बोलणे सोपे आहे.
आयष्यभर आपण
एकमेकांना झेपू शकू का ?
प्रश्न तो होताच होता .
कारण स्वभाव भिन्न असले
तरी गरज एकच होती.
‘ गरज ‘ मग ती कोणतीही असो,
त्याबाबतीत मी नेहमी सावध असतो.
कारण त्या गरजेपोटी आपण नको त्या चुका करून बसतो.
मी जरा सावध होऊन म्हणालो
आपले पटेल का ?
कायमचे?
तशी ती पण साशंक होती.
बोलता बोलता म्हणालो आपण
प्रत्येक वीक एंडला असेच भेटलो तर ?
क्षणभर विचार करून
ती चालेल म्हणाली.
तिच्या उत्तराने मी जरा चकित झालो
पण एक लक्षात आले
ती भेटायला काहीतरी
ठरवून आली होती हे निश्चित
अर्थात मागच्या वेळेला
गप्पातून आमच्या सांपत्तिक
स्थिती , स्वभाव यावर गप्पा झाल्याच होत्या .
आम्ही भेटत होतो,
मस्त भटकत होतो.
लग्न हा शब्द विसरून गेलो जणू.
खरेच एकत्र येण्यासाठी लग्न गरजेचे आहे ?
हा प्रश्न दोघांना पडला आहे…
आमचे चालूच आहे…
तुमचा काय अनुभव आहे..
त्या लग्नाचा …?
आहे उत्तर …भाबडे उत्तर नको ..
खरे उत्तर देऊ द्या…
पण स्वतःला हा प्रश्न जरूर विचारा .
गड्बडलात….?
… या सुट्टीत
म्हणजे कोरोनाच्या सुट्टीत
भांडी घासता आहेत ना..
झाडू मारताहेत ना…
खूप काही केल्यावर
बायको एखादे जळमट
दाखवतेच ना ..किंवा
एखादे नीट न धुतलेले भांडे….?
द्या की उत्तर..
सतीश चाफेकर.
Leave a Reply