तेजोनिधीच्या आगमनाने,
निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,—- डोकावती विस्तीर्ण जलाशयी,—
आपुला रंग लेऊनी पाणी,—–
कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व” अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,–
निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर “निळाई”, वर्षा ऋतूत जेव्हा ‘बरसला’ तुम्ही,
तुमच्यातील पाणीच आले खाली,
निळे–शाssर रंगले माझे पाणी,
किनार्यावर लोक हिंडून बघती, जलभरले’ “मेघ” कुठे असती,–
उत्सुकताही त्यांना केवढी,-?
माझ्यात तुमचे प्रतिबिंब दिसे,
भास्करच त्यांना उत्तर देई ,
थेंब -थेंब पारदर्शक होती,
ही जादू सगळी सूर्यप्रकाशाची,
सोनेरी रंगाचा मुलामा घेऊनी,
पाणी कसे वर बघत असे,
विलक्षण रंगसंगती साधती किनाऱ्यावरती बाजूची झाडे,
हिरवागार रंग कंच लेवुनी, भोवती उभी कशी हिरवाई, आपल्या अद्वैताचे साक्षीदार ते,
शिवाय किनाऱ्यावरची रेती,—–
— हिमगौरी कर्वे
Leave a Reply