एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचा जन्म २९ मे १९१४ रोजी झाला.
हिमालयातील एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. हिलरी यांच्यापूर्वी असे लोक होतेच. त्यांनीही हिमालयाला धडका दिल्या होत्या. परंतु तिथली हिमवादळे, फसवा निसर्ग, डोळे फिरविणा-या द-या आणि दमछाक करायला लावणारे चढ यांनी त्यांना पराभूत केले. हा सारा इतिहास माहीत असतानाही हिलरी एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये सामील झाले आणि शेर्पा तेनझिंग नोर्गेसह एव्हरेस्टवर पाऊल ठेवून त्यांनी एक नवीन पर्व सुरू केले. शिखरावर ते पंधराच मिनिटे थांबले होते. २९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात ‘आधी’ शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत. शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेनझिंग म्हणाले “हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!” एवरेस्टवर उभा असलेल्या तेनझिंग यांचा फोटो सगळ्यांनी पाहिला पण हिलरीचा फोटो नव्हता त्याबद्दल मिश्किलपणे एका मुलाखतीत म्हणाले होते “त्याला कॅमेरा कसा चालवायचा ह्याची माहीती नव्हती आणि एवरेस्टवरच्या मरणाच्या गारठ्यातल्या ठिकाणापेक्षा कितीतरी चांगली ठिकाणे आहेत जिथे मी त्याला हे शिक्षण देऊ शकेन!” तेनझिंग हा दार्जीलिंगमधल्या ‘हिमालयन माऊंटेनिअरिंग इंस्टिट्यूट्चा’ डायरेक्टर होते. १९७८ मधे ‘तेनझिंग नोर्गे ऍडवेंचर्स’ ही गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी कंपनीही त्यांनी स्थापन केली. १९५९ रोजी पद्मभूषण देऊन आणि १९७८ साली ‘तेनझिंग नोर्गे सन्मान पदक’ देऊन भारत सरकारने गौरव केला होता. तेनझिंग म्हणाले होते की “कारकीर्दीला ओझीवाहू हमालापासून सुरुवात करुन ते अनेक पदके लटकवलेला कोट घालून विमानातून ठिकठिकाणचा प्रवास करणारा आणि शेवटी उत्पनावर प्राप्तीकर भरण्याची चिंता करणारा मी पहिलाच शेर्पा असेन!
शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे निधन ९ मे १९८६ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे शेर्पा तेनझिंग नोर्गे यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply