नवीन लेखन...

भारतातील दहशतवादी हल्ले आणि सौदी अरेबियातून मदत

Terrorist Attacks in India Funded by Saudi Arabia

सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्‍हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व  तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला जात आहे.

प्रसारमाध्यमंही फारसा मागचा-पुढचा विचार न करता तपासयंत्रणातील अधिकार्‍यांचे विविध गट जी माहिती पुरवत आहेत, ती  वाचकाच्यापुढे ठेवत आहेत. किती महत्वाची आहे, अबू जुंदालची अटक?त्याच्या अटकेमुळे देशातिल हल्ले थाम्बतिल का?आज देशामध्ये ३००-३५० छुपं दहशतवादी सेल असावे. (SLEEPER CELLS) तपासयंत्रणा व गुप्तहेर संघटना त्यान्च्या कडे का दुर्लष करत आहेत ?तपासयंत्रणा या माहिती युद्धमुळे त्याना सावध करुन पळुन जायला मदत तर करत नाही?अबू जुंदालबाबतचा हा सगळा तपशील अशा रीतीनं प्रसिद्ध करुन एक ‘दुश प्रचार युद्ध’ (DISINFORMATION CAMPAIGN ) प्रसारमाध्यमांतून, खेळला जात आहे. 26/11 च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अबू जिंदालच्या चौकशीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.   जिंदालने नेपाळमध्ये लष्कर-ए-तैय्यबाकडून दहशतवादाचे धडे गिरवल्याचे उघड झाले आहे.

सौदी अरेबियाशी जवळीक  महत्त्वाची

असे असले तरी जिंदालला भारताच्या ताब्यात देण्यात सौदी अरेबियाने केलेली मदत महत्वाची आहे. खरे पाहता सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा जवळचा मित्र. त्याच्या विरोधात जाऊन एरवी सौदी अरेबियाने भारताला मदत केली नसती. पण या प्रकरणी अमेरिकेच्या मदतीने अबू जिंदाल भारताच्या हाती लागला. ताज्या माहितीवरून झैबुद्दीन अन्सारी किंवा अबू जिंदालची दहा-बारा खोटी नावे असल्याचे स्पष्ट झाले. लष्कर-ए-तय्यबाने त्याला सौदी अरेबियात नव्याने भरती झालेल्या अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले होते. साधारण आठ ते नऊ महिन्यांपूर्वी त्याने सौदी अरेबियातून पाकिस्तानमध्ये फोन केला होता. त्यावेळचे संभाषण अमेरिकेने पकडले. त्याच वेळी भारताच्या “रॉ’ या गुप्तचर यंत्रणेने अबूच्या कारवायांकडे लक्ष ठेवून त्याचा पाठलाग करायला सुरूवात केली.

अर्थात सौदी अरेबियाला अमेरिकेला दुखवायचे नव्हते हे यामागचे खरे कारण आहे. सौदी अरेबिया तेलाची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो, पण हा ग्राहक त्याच्यापासून दुरावला आहे. सौदी अरेबियाला भारतासारखा मोठा तेल ग्राहक हवाच आहे. यामुळेच त्याने पाकिस्तान-बरोबर जवळचे संबंध असतानाही भारताला मदत केली.  अशा वेळी भारताची सौदी अरेबियाशी जवळीक निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. यातून भविष्यात दहशतवादविरोधी चळवळीला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. भारताने इराणकडून तेलाची निर्यात कमी केली आणि त्याची जागा सौदी अरेबिया घेत आहे. सौदी अरेबियाला एकंदरीत, इराण हा नंबर एकचा शत्रू वाटतो. त्यात इराण अण्वस्त्रे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सौदी अरेबियाच्या चिंतेत भर पडली आहे.

काश्मीरमध्ये सौदी  आक्रमण

सौदी अरबमधील ‘अहले हदीस’ या कट्टर मुसलमान संघटनेने काश्मीरमध्ये स्वतःचा वहाबी संप्रदाय स्थापन केला आहे.व काही काश्मीर नागरिकांच्या मनातून भारताविषयीची आत्मीयता नष्ट करण्यात यश मिळवत आहे .वहाबी संप्रदायाने सध्या काश्मीरमध्ये ७०० मशिदी बांधल्या आहेत. तेथे येणार्‍या  काश्मीरीची संख्या प्रतिदिन वाढत आहे. श्रीनगरमधील बारामुला जिल्ह्यातील प्रत्येक गावात वहाबी संप्रदायाची एक मशीद बांधण्यात आली आहे. या मशिदीमध्ये येणारे स्थानिक मुसलमानांचे वर्तन सौदी अरबमधील मुसलमानांसारखे असते. त्यांच्यावर तालिबानी विचारांचा प्रभाव अधिक दिसतो. केंद्रीय गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार, सौदी अरब राष्ट्राने दक्षिण आशियात वहाबी संप्रदायाचा प्रसार करण्याकरता मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी २००५ मध्ये ३५ अरब डॉलर (१ लक्ष ७५ सहस्र कोटी रुपये) दिले होते. त्यांतील काही भाग जम्मू आणि काश्मीरमधील वहाबी संप्रदायाच्या अनुयायांसाठी देण्यात आला होता. आजही काश्मीरमध्ये अनधिकृतरीत्या परदेशातून पैसा येत असतो. केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि पाक यांच्यामध्ये व्यापारसंबंध शिथील करून या ठिकाणी वस्तूंची ने-आण करण्यास अनुमती दिली आहे; मात्र त्या ठिकाणी वस्तू पडताळण्याकरता एकही प्रभावी यंत्रणा बसवण्यात आली नाही. त्याचा गैरफायदा घेऊन सौदी अरबमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आणला जातो. सध्या वहाबी संप्रदायाचे काश्मीरमध्ये १५ लक्ष अनुयायी बनले असावेत. याचा अर्थ काश्मीरमधील एकूण लोकसंख्येचा १६ प्रतिशत भाग वहाबी संप्रदायाचा बनला आहे. या राज्यात १५० शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे उभारण्यासाठीही पैसा पुरवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त श्रीनगरमध्ये २०० कोटी रुपये खर्च करून ‘ट्रान्सवर्ल्ड मुस्लीम युनिव्हर्सिटी’ या नावाने विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यावर सौदी अरब देशाचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण असणार आहे. याशिवाय श्रीनगरमध्ये ७ सहस्र मशिदींमधून आता वहाबी संप्रदायाची शिकवण शिकवली जाऊ लागली आहे. काश्मीरमधील मुसलमानांवर वहाबी संप्रदायाचा प्रभाव वाढत चालला असून तेथील मुसलमानांनी सौदी अरब राष्ट्राची संस्कृती स्वीकारल्याचे दिसतेअसे अनेकविध प्रयत्न  करत असल्याने सध्या काही काश्मीर नागरिक सौदी गोडवे गातांना दिसतात. हे आक्रमण व काश्मीरचे वहाबीकरण थाम्बवले पाहिजे.

सावधगिरी बाळगण्याची गरज

सौदी अरेबियाशी सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न  महत्त्वाचे आहेत. परंतु ही पावले टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्लानी दहशतवादाचा धोका साऱ्या जगाला असल्याचे म्हटले आहे. परंतु कशा रीतीने हा दहशतवाद फोफावला, त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा कुणी पुरविला, हे प्रश्‍न पुढे आणले तर बोट सौदी अरेबियाकडेच जाते. तालिबानला फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत पुरविणारा हा देश ती थांबविणार आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. मुल्ला-मौलवींना आपल्या आधीन ठेवण्याचे तिथल्या राजाचे धोरण अशी सौदी अरेबियातील परिस्थिती आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानातील परिस्थिती स्फोटक बनण्यात सौदी अरेबियाचा वाटा मोठा आहे. इस्लाममधील कट्टरतावाद जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने तेथून झाला आणि त्या भूमिकेपासून तो देश दूर जाण्याची शक्‍यताही दिसत नाही.एकीकडे इस्लामी कट्ट्ररतावादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारायचे आणि त्याच वेळी दहशतवाद थोपविण्याची भाषा करायची. हे दोन्ही एकाच वेळी कसे साध्य होणार? त्यामुळेच सौदीच्या इराद्यांबाबत सावध भूमिका घेतली पाहिजे. डोळ्यात तेल घालून भारताचे हित जपले पाहिजे. वास्तविक अशा गुंतागुंतीच्या प्रश्‍नात राजकीय परिपक्वता दाखवायला हवी.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..