आज नोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरुवार…. अमेरिका आणि कॅनडामध्ये थॅंक्स गिव्हिंग डे साजरा केला जात आहे.
अमेरिका आणि कॅनडामध्ये सध्या उत्सवाचे वारे वाहत आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये येथे उत्सवी आणि उत्साहाचे वातावरण असते.जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या देशांची संस्कृती आणि त्यांचे सण-उत्सव आपल्याला ठाऊक झाले आहेत. यामुळे आता अमेरिकेतही आपली दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी होते आणि भारतामध्ये नाताळ मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिका आणि कॅनडामध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी ‘थॅंक्स गिव्हिंग डे‘ साजरा केला जातो
थॅंक्स गिव्हिंग डे चा इतिहास.
अमेरिकेत पहिला थँक्सगिव्हिंग १६२१ च्या नोव्हेंबर महिन्यात साजरा केला गेल्याचं उल्लेख आढळतो. १६२० साली इंग्लडमधले १०२ प्रवासी नवीन भूखंडाच्या शोधात बोटीनं निघाले होते. पण वारा, अपुरा अन्नाचा साठा, आजारपण यामुळे अर्ध्याधिक लोक मृत्युमुखी पडले. ही बोट शेवटी प्लिमथमध्ये आली. प्रवासात जे लोक वाचले त्यांना ‘नेटिव्ह अमेरिकन्स’ लोकांनी खूप मदत केली. त्यांना तिथेच स्थायिक होण्यासाठी, घरं बांधून देणं, शेतीची कामं शिकवणं अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्थानिकांनी मदत केली. त्यांचे आभार मानण्यासाठी या नवीन लोकांनी त्यांना जंगी मेजवानी दिली. तो दिवस होता १६२१ च्या नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि तेव्हापासून ‘थँक्सगिव्हिंग’च्या प्रथेला सुरूवात झाली.
त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केले गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.
आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. अमेरिकेत तर या दिवशी विविध शहरांमध्ये परेड निघते. आता पर्यटकांसाठी हा एक सोहळा झाला आहे. काही देशांमध्ये ऑक्टोबरमध्ये, तर काही देशांमध्ये नोव्हेंबरमध्ये हा दिन साजरा केला जातो. सगळेच थॅंक्स गिव्हिंगच्या लॉंग वीकेंडच्या मूडमध्ये असतात. सुट्टीच्या या चार दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरी त्यांचे नातेवाईक-मित्रांसोबत पार्टी, पिकनिक, गेटटुगेदरचे प्लॅन्स होतात.
आपल्या समूहातील अमेरिकेतील सभासदांना व इतर सभासदांना ‘थॅंक्स् गिव्हिंग डे‘ च्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply