नवीन लेखन...

‘उभ्या उभ्या’ खाणे

आज ऑफिसच्या लंच टाईममध्ये पण काम होतं. जेवण शक्यच नव्हतं. मग काय; उभ्या उभ्याच सँडविचचे काही बाईट्स घेतले.” आजकाल सर्रास ऐकू येणारे वाक्य. ‘उभ्या उभ्या’ खाणे ही संस्कृती सध्या फार वाढीला लागली आहे. फार कशाला? आपण लग्न समारंभात वगैरे देखील पंगत बसणे या प्रकाराला तब्येतीत चाट दिली असून तिथेही उभ्याने जेवण्याचे बुफे आले आहेतच.

आयुर्वेद सांगतो जेवताना शांतपणे आणि प्रसन्न जागी बसून जेवावे. मांडी घालून बसण्याच्या पारंपरिक भारतीय पद्धतीमुळे आपण प्रमाणात आणि नीट चावून चावून खातो हे त्यामागील शास्त्र होय. उभे राहून खाणाऱ्या व्यक्ती बहुतांशी आरोग्यास घातक पदार्थ (जंक फूड) अधिक मात्रेत आणि जलद गतीने खात असल्याने अपचनापासून अगदी श्वास लागण्यासारख्या कित्येक गंभीर विकारांपर्यंतच्या त्रासांना निमंत्रण देत असतात. उभे राहून खाताना आपल्या पचनसंस्थेशी संबंधित अवयव योग्य स्थितीत नसणे हेदेखील आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे महत्वाचे कारण आहे. (संदर्भ: Journal of the Academy of Nutrition and Dietetics)

टेबल- खुर्चीच्या वापरापेक्षा जमिनीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसणे ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता जाता उभ्याउभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मूर्खलक्षणे सांगत असताना समर्थ ‘मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ।।’ असे का म्हणतात त्यामागे हे कारण दडलेले आहे इतके जरी आम्ही लक्षात घेतले तरी कित्येक आरोग्य समस्यांपासून दूर राहणे सहजशक्य आहे.

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Aug 19, 2016

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..