नवीन लेखन...

बदल

बदल , चेंज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होणारा बदल, तसेच आपल्या बुद्धिमत्ता उंची वजन यामध्ये होणारा बदल .आयुष्यात बदल होणे हे गरजेचे आहे. येणारी प्रत्येक वेळ धरून ठेवावी अस वाटत असते .पण, येणारा प्रत्येक क्षण बदलत असतो .बदलणारा प्रत्येक क्षणाचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो .पण बदल होणे गरजेच आहे .

रोज सकाळी उशिरा उठणारे आपण दिपावलीच्या सणात सकाळी पाच वाजता उठून अभ्यंगस्नान करतो .दीपावलीच्या सणामुळे किंवा लवकर उठल्यामुळे स्वतःमध्ये नक्कीच बदल घडतो .मन व शरीर नक्कीच प्रसन्न होते .नवीन गोष्ट करून बघितले की त्या बदलणारे क्षणाचा नक्कीच उपभोग घेता येतो . त्या बदलामुळे मन नक्कीच आनंदी होते .प्रत्येक गोष्टीत चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर नक्कीच होतो .घेतलेल्या प्रत्येक श्वासाची गणना भूतकाळात नक्कीच होत असते .आजचा दिवस काल असा भूतकाळात गणला जातो .प्रत्येक वेळी होणाऱ्या बदलाचे चांगले परिणाम आपल्याला हवेहवेसे वाटतात. पण वाईट बदलांची जाणीव लवकर होत नाही आणि आपण भानावर येईपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते .येणाऱ्या प्रत्येक बदलाला पण नेहमी उभे राहिले पाहिजे.

आपल्या व्यक्तीमत्वात होणारा बदल आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असतो. आपण स्वतः आपल्या आयुष्यातील बदलांचे साक्षीदार असतो .आपल्या व्यक्तिमत्त्व विकास हा आपल्या असलेल्या चांगल्या सवयी, संगत , चांगले कौटुंबिक वातावरण , आजूबाजूच्या व्यक्ती यावर अवलंबून असते. लहान बाळ जेव्हा स्वतःच्या पायावर धडपडत चालू लागते .तेव्हा त्याच्यामध्ये बदल हा आई-वडिलांना खूप चांगला असतो. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पुरवणारा नक्कीच ठरतो .पण बाळ जेव्हा उभा राहता राहता खाली पडते .तेव्हा आई वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंता निर्माण करते .आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यामध्ये अनेक बदल घडत जातात. बाळ हळू रांगत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत राहतं .मग काही वेळा त्यामध्ये त्याला पुन्हा प्रयत्न करते. आणि पुन्हा स्वतःच्या पायावर चालण्याचा ते प्रयत्न करते आणि ते काही दिवसांनी धावते सुद्धा आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू बदल आहे .

आज आपल्या ताटामध्ये ज्यांचा मेहनतीमुळे अन्न मिळते ते म्हणजेच आपले शेतकरी .शेतीची मशागत केल्यानंतर शेतकरी पावसाची देवासारखी आभाळाकडे डोळे लावून शेतकरी वाट बघत बसतो .जून महिन्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरी शेतकऱ्यांबरोबरच पक्षी प्राणी फुले झाडे यांना नवसंजीवनी देतात . पावसामुळे झाडांना पालवी फुटते .झाडे आनंदाने डोलू लागतात .हा वातावरणातील आपल्याला हवा असणारा बदलच आहे.एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरी सर्वांना सुखावून जातात. पावसाची वाट बघत बसणाऱ्या प्रत्येक जण आनंद घेऊन जातो. पाऊस म्हटलं म्हणजे चहा आणि एक नात वेगळेच आहे . पाऊस म्हटलं म्हणजे कवींना आमंत्रण जाणू वातावरणातील बदल हा आपल्या आयुष्यातील एक वेगळाच बदल ठरतो. तो आपल्याला सुखदायक वाटतो .आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कधीतरी सुखदुःखाचा आपल्याला त्रास नक्कीच होत असतो. सुखानंतर दुःख हे चक्र नेहमी चालू असते .आपल्या आयुष्यात घडणाऱ्या आनंदाच्या सुखाच्या सरी आपल्याला हव्याहव्याशा वाटतात .पण दुःख यांचा त्रास आपल्याला अधिक होतं .चांगला सुखदायक बदल आपल्याला चांगलाच वाटतो .पण दुःखदायक किंवा त्रासदायक बदल हा आपल्याला नकोसा वाटतो. आयुष्यात बदल होणे देखील गरजेचे आहे त्याशिवाय आयुष्याची बदला ची किंमत आपल्याला कळत नाही.

एखाद्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेत मिळालेले अतिशय उत्कृष्ट गुण त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप उपयुक्त ठरते . त्या बदलामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील फरक नक्कीच जाणवतो. त्याच्या मानसिकता व व्यक्तिमत्त्व यामध्ये प्रचंड फरक पडतो .त्याच्यामध्ये एक चांगला बदल घडून येतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याला चांगलेच भासत जातात .आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगले वाटत असतात .त्या विद्यार्थ्यांचे आयुष्याकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक होत जाते .व त्याला त्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरते .त्याचप्रमाणे एखाद्या नोकरीतील प्रमोशन हे देखील त्याच्या आनंदासाठी कारणीभूत ठरतो . बदल चांगला असो वा वाईट गरजेचे आहे. चांगला जरी घडला तरी त्यातून हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवून येणाऱ्या प्रत्येक बदलाला सामोरं जाणं हे गरजेचे आहे . शालेय जीवनातून जेव्हा कॉलेज जीवनात जेव्हा त्या विद्यार्थ्याचा प्रवेश होतो , तेव्हा त्याच्या मध्ये होणारा बदल हा अतिशय चांगला होता .शालेय जीवनानंतर सुद्धा खूप मोठं जग आहे .त्याची जाणीव त्याला तेव्हा होते आणि त्यानंतर कॉलेजला ” कॉलेज लाईफ इज गोल्डन लाइफ ” का म्हणतात या वाक्याची प्रचिती येते .

एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर जग वेगळेच आहे .त्याच्या अनुभूती येते. जग सुंदर आहे .याची जाणीव होते .जग सुंदर वाटू लागत. त्यावेळी व्यक्तिमत्वातील जे बदल घडतात. ते चांगलेच बदल घडतात .संपूर्ण जगाकडे बघण्याची दृष्टी ही सकारात्मक राहते . जग खूप सुंदर आहे याच्या अनुभूती होऊ लागते .पण जेव्हा एखादी व्यक्ती सोडून जाते .तेव्हा हे जग आपल्याला नकोसे वाटते किंवा आयुष्यात नकारात्मक बदल घडत जातात .पण त्या बदलाला देखील सकारात्मक वृत्तीने बदल केलाच तर येणारा प्रत्येक क्षण चांगला असतो.

रोजच्या दिवसभराच्या रुटीनमधून आपण थोडा वेळ काढून आपण आपले एखाद्यावर जोपासले तर , मनामध्ये होणारा बदल हा आनंददायी असतो. त्याच प्रमाणे एखाद्याने पर्यटन स्थळी भेट दिल्यानंतर त्या पर्यटन स्थळा वरील वातावरण आपल्याला मनाने व शरीराने ताजेतवाने होतो.एखाद्या दिवशी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गड किल्ल्यांना भेट दिली तर, आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आदर आणखीनच वाढतो. महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर भेट दिली असता तो गड सर करत असताना आपल्याला धाप लागते .तेव्हा मनात नक्कीच विचारांचे काहूर माजते .आज एवढ्या सोयी सुविधा असून देखील आपल्याला गड-किल्ले चढत असताना थोडा त्रास होतोच .पण ,साडेतीनशे वर्षापूर्वी कोणतीही सुविधा नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गड कसे सरळ करत असतील असे वाटते .त्यांची स्वराज्य प्रती असलेली निष्ठा त्यातून आपल्याला सहज दिसून येते आणि आपला जन्म शिवकाळात का झाला नाही अशी आपल्या मनाला हुरहूर लागते .महाराजांचा पायाची धूळ जरी आपल्या माथ्याला लागले तरी आपण धन्य झालो असतो. आपण वर्षातून नाहीतर महिन्यातून एकदा तरी गड किल्ल्यांना भेट दिली पाहिजे. गड किल्ले सर करत असताना मनामध्ये असलेली उत्सुकता व फिरत असताना आणि गड सोडून खाली येताना मनाला एक वेगळेच समाधान मिळते त्यामुळे बदल हा गरजेच आहे .

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चांगले-वाईट बदल घडत असतात .त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर नक्कीच नक्कीच होतो. असे काही क्षण असतात ते कधीच जाऊ नये असे आपल्याला वाटत असते. समुद्राची वाळू हातातुन निसटुन जावी त्याप्रमाणे ती वेळी निश्चित जाते बदल घडत जातो. बदलणारी वेळ बदलणारी परिस्थिती आणि बदललेला माणूस आपल्याला चांगलं किंवा वाईट आपण घट्ट कसे राहावे हे शिकवून जातात. अनेक बदलांची परिणाम आपल्यावर नक्कीच होतात आणि त्यावेळी शांतता व संयम ठेवून सकारात्मक दृष्टीने विचार केला तर त्या वेळी आपण सुखरूप बाहेर पडतो . असे बदल सुद्धा आपल्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात .राहुल देव बर्मन यांनी त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत आयुष्यातील बदलाबद्दल त्या गीतातून स्पष्ट होत आहे . ” जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना ” आयुष्य हे एक सुंदर सफर आहे आणि त्या सफारीचा आनंद आपण घेतलाच पाहिजे . आपल्या जीवनातील प्रत्येक बदल आपल्याला अनुभव देऊन जातो रोजच्या सवयी तील झालेला बदल हा नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वात जाणवतो आपल्या स्वतःच्या स्वभावामुळे किंवा सकारात्मक वृत्तीमुळे इतरांच्या आयुष्यात झालेला बदल आपल्याला नक्कीच सुखावून जातो त्यामुळे बदल घडणे गरजेचे आहे

— गिरीशकुमार तुकाराम कांबळे

Avatar
About गिरीशकुमार कांबळे 1 Article
MH -09 MH-09 MH-09 Civil ENGINEER Blogger @girishkumarkamble.blogspot.com
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..