आजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे। आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो।
आज वाग्भट ऋषी असते तर त्यांनी आधुनिक ग्रंथात सेल्फी रोगाची चिकित्सा नक्कीच लिहिली असती।
पण तरी याच्या बद्धल बोलायचे झाले तर हा बाहेरून येणार दोष असून तो आधी मनावर कार्य करून सत्व गुण पूर्ण नष्ट करतो व तम् गुण वाढवतो, त्या योगे मनोवह स्रोतास दूषित होऊन शरीरात वात पित्त कफ यांची स्थिती बिघडवितात।
त्याने सतत सेल्फी चा विचार डोक्यात घोळत असतो।
एखादी जागा दिसली की ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक आसने करू लागते, चेहऱ्याच्या स्नायू मध्ये वात प्रकुपित होऊन असंख्य प्रकारचे चंबू तयार होतात।
असे पुन्हा पुनः होऊ लागते, पर्यायाने खाल्लंले अंगाला लागत नाही, म्हणून धातूं मध्ये दोष उत्पन्न होतात, एकंदरच काय तर संपूर्ण health loss.
दुर्दैवाने या आजारावर अजून काही उपचार नाही। पण जर प्रत्येक पालकांनी ठरविले तर नवीन पिढीला या पासून दूर ठेवू शकतो, व त्यांची ऊर्जा सकारात्मक गोष्टीं मध्ये वळवू शकतो।
–आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने
Leave a Reply