नवीन लेखन...

दहशतवादाच्या लढाईमध्ये देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरू अललेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याला जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाजी रशीद ,कामरान आणि एक स्थानिक दहशतवादी(एकुण ३) यांना ठार करण्यात यश आले आहे. गाजी रशीद यानेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता, तर कामरान हा या हल्ल्याच्या कटात सहभागी होता. ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरामाइंड अब्दुल गाझी आहे व हा मसूद अझहरचा निकटवर्तीय आहे.

दहशतवाद्यांना अमाप प्रसिध्दी, शुर विरांचे नाव पण माहित नाही

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुरू असलेली चकमक तब्बल १८ तासांनतर संपली. यात एक मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत, मात्र तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मेजर डीएस ढोंढियाल, शिपाई सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंह ही त्या शुर विरांची नावे आहेत. शिपाई गुलजार मोहम्मद हे जखमी झाले आहेत. या चकमकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक,सैन्याचे ब्रिगेडियर यांच्यासह अनेक अधिकारी व सैनिक जखमी झाले आहेत.ब्रिगेडियरना पोटात गोळी लागली. याच एन्काऊंटरमध्ये एक कॅप्टन आणि लेफ्टनंट कर्नल यांना सुद्धा गोळी लागून ते जखमी झाले आहेत. सर्वांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.मिडियाने त्यांची नावे शोधण्याचा फ़ारसा प्रयत्न केला नाही. ब्रिगेडियर हरबीर सिंग लेफ्टनंट कर्नल राहुल गुप्ता, कॅप्टन सौरभ पटणी, मेजर विनायक आणि अनेक शूर सैनिक गंभीर रित्या जखमी झाले. त्यांची नावे देशाला कळणे गरजेचे आहे. आशा करूया सर्व लवकरच बरे होतील.दहशतवाद्यांना अमाप प्रसिध्दी दिली गेली.हे थांबले पाहिजे.

भारतीय सैन्याची परंपरा आहे की सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादी विरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते परंतु यामध्ये आपल्या अधिकार्यांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण करावे लागते.

आधी लग्न कोंडाण्याचे

शनिवारी नियंत्रण रेषेजवळ मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले. राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आईडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन त्यात त्यांना वीरमरण आले.मेजर चित्रेश यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. इकडे वडील त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होते आणि तिकडे सीमेवर त्यांना वीरमरण आले. विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुटी घेण्याचा वडिलांचा आग्रह असतानाही त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होते.

पुलवामाचा हल्ला झाल्यापासून मिडिया, देशप्रेमी नागरिक अनेक विषयांवर चर्चा करत आहे.सरकारने काय करावे?सैन्याने काय करावे?सिआरपिएफ़ने काय चुका केल्या वगैरे वगैरे. आता कोण काय म्हणाले, त्यापेक्षा आपण काय केले पाहिजे, हे देशाच्या दृष्टीने जास्त हिताचे आहे. त्यासाठी देशवासीयांना आता जागे होण्याची वेळ आली आहे. सैन्याने नेमकी कोणती कारवाई करावी हा टीव्ही /मिडियामधे चर्चेचा विषय नाही.नेमकी कारवाई करण्याकरिता सैन्य सक्षम आहे.

राजकिय पक्षांनी, सरकारने काय करावे?

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर आपल्या देशाने पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा राष्ट्र काल मागे घेतल्याचे जाहीर केले. राजकिय पक्षांनी काय करावे हा एक महत्वाचा विषय आहे. आमचे राजकीय नेते त्याचे राजकारण करत आहेत. त्यांनी व्होट बँकेसाठी काही लोकांना जवळ केले आहे. या बोटचेपी भूमिकेमुळे आमच्याकडे दहशतवाद फोफावत आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात.

प्रतिकात्मक पुतळे जाळुन, बंद पाळुन, मेणबत्ती लावून दहशतवाद थांबणार नाही

सर्वांत प्रथम हुल्लडबाजी करून देशाची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य नागरिक सैन्याच्या मागे उभा राहून दहशतवादा विरोधात नेमकी काय भूमिका निभावू शकतो?

आतंकवादी आक्रमणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात पाकिस्तान आणि आतंकवादाचे प्रतिकात्मक पुतळे जाळणे, बंद पाळणे, मेणबत्ती लावून निषेध व्यक्त करणे आदी पहायला मिळत आहेत. या आधी उरी, पठाणकोट, मुंबई आणि त्याआधी संसदेवरील आक्रमण ह्यावेळी हेच चित्र पहायला मिळाले.या मुळे आतंकवाद थांबला नाही व आता व्यक्त केलेल्या देश भक्तीमुळे पण तो थांबणार नाही.त्या करता आपल्याला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतिल.पारंमपारिक युध्दाची तयारी करावी लागेल.त्यात सरकारवर जास्त दबाव आणून घाईघाईने काहीतरी करण्यास भाग पाडणे उचित नाही, आज आपण जर पाकिस्तानशी थेट युद्ध पुकारायचे ठरवलेच, तर आपण किती हानी सहन करू शकतो याचा विचार अगोदर केला पाहिजे. याकरता जर सैन्याचे बजेट वाढवण्यासाठी जर कश्मिर /  पुलवामा कर पेट्रोल किमतीवर लावला तर त्याकरता आपण तयार आहोत का?  केवळ श्रद्धांजली न वाहता राष्ट्रीय एकात्मकता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशातील सर्वांनी  गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. रडण्यापेक्षा लढल्याची तयारी केली पाहिजे. तरच अशा  हल्ल्यांना आळा बसेल.

मेणबत्त्या जाळून किंवा घोषणा देऊन दहशतवादविरोधी अभियानात यश मिळणार नाही.नुसती देशभक्तीच्या भावना व्यक्त करुन दहशतवाद थांबणार नाही.त्याकरिता कृतिशील कारवाईची गरज आहे.

सामान्य नागरिकांनी नेमके काय करायचे?

प्रत्येक नागरिकाने आपापल्या भागामध्ये ,आपापल्या संस्थामध्ये एक सैनिक म्हणून,एक गुप्तहेर म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे.कान आणि डोळे उघडे ठेवा ,आपला भाग सुरक्षित ठेवा.

आज ७०% भारतीय हे सोशल मीडियावर आहेत.कान आणि डोळे सोशल मीडियावर देखील उघडे ठेवा.सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट बघितली तर लगेच त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवा जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल.

हुतात्मा झालेल्या कुटुंबाची ,मानसिक मदत जास्त,आम्ही हुतात्मा झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी आहोत हा विश्वास द्या.आर्थिक मदतीसाठी सैन्याचे अनेक अकाउंट्स उपलब्ध आहेत.या माध्यमातूनही आपण सैनिकांना मदत करू शकतो.

अजूनसुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ञ देशविरोधी वक्तव्ये करून सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात.काही पाकधार्जिणे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ़्ती ,आणी अनेक याचे राजकारणही करताना दिसत आहेत. नेत्यांनी देशाच्या बाजूने राहण्याची बुद्धी मिळू दे. उद्याही कोणी अहिंसेचे पुजारी, कोणी मानवाधिकारी आपापले मुद्दे मांडायला आसुसलेले असतीलच. सगळे पक्ष एकदिलानं सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील, पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्टे नेते त्यात खोडय़ा काढतील.

अनेक राजकारणी  समाजामधील वेगवेगळ्या घटकांना तुमच्या वरती अज्ञान होतो आहे हे सांगून ऊठसूट हिंसक आंदोलने करण्यास भाग पाडतात. यामध्ये सामील होऊ नका. कारण हिंसक आंदोलना मध्ये नुकसान हे आपल्या देशाचे होते. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात वेगवेगळ्या आंदोलनात 40% एस्टी गाड्या जाळण्यात आल्या आहेत.

कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी.

सीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा जास्त शत्रू सीमेच्या आत आहेत.जर देश एकत्र पाठी मागे उभा नसेल तर, का बलिदान द्यावे आमच्या सैन्याने? त्यांची नावे,त्यांची दुष्क्रुत्ये शेयर केली जावी ज्यामुळे या सगळ्या पाकप्रेमी,चीनी प्रेमींवर सामाजिक बहिष्कार घालता येइल.

पेट्रोलचे भाव वाढवावा लागला ,सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी कर वाढवले गेले तरी तक्रार करू नका.मला हे हवे ते हवे असे न करता सैन्याला मजबूत करण्यासाठी सैन्याचे बजेट वाढवण्यासाठी कर भरुन हातभार लावा.एकमेकांत भांडत न बसता,समाजात तेढ न पसरवता एकत्र व्हा आणि सगळे मिळून सैन्याच्या मागे उभे रहा. चीनी मालावर बहिष्कार घाला.

देशभक्ती रोजच्या जिवनात व अनेक वर्षे

आपण भारतीय केवळ एक दिवस प्रतिकात्मक देशभक्तीचे प्रदर्शन करून उरलेले दिवस मात्र त्याच पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट सामने आणि पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे पाहण्यात घालवतो. आपली एक दिवसाची राष्ट्रभक्ती जागृत व्हायला सैनिकांना हुतात्मा व्हावे लागते, हे चित्र दुर्दैवी आहे.

त्यासाठी आपले पद, पक्ष बाजूला करून सरकारला आवश्यक तो पाठिंबा देखील द्यायला हवा. एक दिवसाची मर्यादित राष्ट्रभक्ती नव्हे, आता राष्ट्रहिताच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिदिन राष्ट्रभक्ती जोपासायला हवी!

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..