साहित्याचा जनमानसावर परिणाम ‘जो वाचेल तो वाचेल’ ही म्ह्ण आपल्या मराठीत वारंवार वाचायला ऐकायला मिळते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील का असेना जनमानसावर त्याचा परिणाम हा दिसतच असतो. अगदी अशिक्षीत माणसावरही त्याचा परिणाम होत असतो कारण अज्ञानी निरक्षर माणूसही सल्ला मागायला कोणाकडे जातो ? ज्याला साहित्याची जाण आहे ज्याचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आहे अशा माणसाकडे. पूर्वी आपल्याकडे सुशिक्षीत माणसाला चार बुके शिकलेला माणूस म्ह्णून संबोधले जायचे. चार पुस्तके वाचलेला माणूस ज्ञानी, सज्ञानी,सुसंस्कृत आणि सभ्य असतो हे काही काळापूर्वी पर्यंत गृहीतच धरलं जायचं. पण आता ते चित्र बदललय कारण आता बाहुसंख्य लोक सुशिक्षीत झालेत त्यामुळे आता कोण काय वाचतो यावरून तो कसा आहे हे ठरत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते आपल्या देशाला शिकलेल्या लोकांपेक्षाही शीलवान लोकांची जास्त आवश्यकता आहे. आजचे साहित्य आजच्या पिढीत ते शील निर्माण करण्यास सक्षम आहे का ? या प्रश्नाच्या उत्तरातच बरंच काही दडलेले आहे. साहित्याचा जनमाणसावर परिणाम होतच असतो पण तो एक सारखा नसतो. कधी तो चांगला वा वाईट असतो, तात्पूरता, दीर्घकाल टिकणारा अथवा अनंत काळापर्यंत टिकणारा ही असू शकतो.
जोपर्यंत मानव या पृथ्वीच्या पाटीवर आहे तोपर्यंत आता साहित्य निर्मिती होत राहणारच हा ! साहित्याची भाषा त्याचे विषय आणि ते माणसापर्यंत पोहचविणारे माध्यमे मात्र बदलणार पूर्वी फक्त पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य पोहचायचे त्यानंतर संगणकाच्या आणि आता मोबाईलच्या आणि भविष्यात आणखी कशाच्या माध्यमातून माध्यमे बदलत राहतील पण साहित्याचा जनमानसावर परिणाम होतच राह्णार.
साहित्य हे समाजमनाचं प्रतिबिंब असतं. प्रत्येक माणूस त्यातूनच त्याला हवा तो, त्याला हवा तसा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगला वाईट बोध घेत असतो. आपला देश पारतंत्र्यात असताना जनमानसाच्या मनात स्वातंत्र्या बाबतची आस्था कोणी निर्माण केली, साहित्यानेच ना ? जगातील कोणतीही मोठी क्रांती साहित्याच्या माध्यमातूनच होत असते. फक्त लिखित साहित्य नाही तर अलिखित साहित्य ही कधी कधी जनमानसाठी प्रेरणादायी ठरत असते. आजही आपल्या देशात पौरणिक साहित्य लोकांना पापकर्मापासून दूर ठेवण्यास पुरक ठरत आहे. साहित्यच आहे जे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडून ठेवत असत. जर साहित्य नसत तर जनमानसाला भूतकाळ फक्त फुसटसा आणि तुटक तुकडया तुकडयात कळला असता.
साहित्य निर्मिती कोणत्या मूल्याची होत आहे यावर वर्तमान समाजाच भविष्य ठरत असत अर्थात मानसाच भविष्य ठरत असत अर्थात मानसाच भविष्य वर्तमानातील साहित्यावर अवलंबून असत. साहित्य कित्येक पिढया घडवू ही शकत आणि बिघडवू ही शकत. साहित्याचा जनमानसावर होणारा परिणाम हा कधीही नसंपणारा विषय आहे हे नक्की…
— निलेश बामणे
Leave a Reply