ॲलिस्टर मॅक्लीन यांच्या ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित, जेली थॉमप्सन दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे १६० मिनिटांचा असून यात ग्रेगरी पेक, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन, अँथनी क्वेल आदी एकापेक्षा एक मातब्बर कलावंत आहेत. या चित्रपटाला ऑस्करची ६ नामांकने मिळाली होती तर २ गोल्डन ग्लोब अवॉर्डसह १ ऑस्कर मिळाले होती.
ग्रीस जवळील खिरो बेटावरील तळावर सुमारे २००० ब्रिटीश सैनिकांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला परतवून लावण्याची जबाबदारी ब्रिटनच्या रॉयल नेव्हीवर येते. मात्र, इजिप्शियन सागरातून जातांना नेव्हरॅान येथील एका किल्ल्यातून रडार संचलित महाकाय तोफांमधून होणाऱ्या बॉम्ब वर्षावातून ब्रिटीश नेव्ही किंवा वायुदलाला पुढे सरकणे अशक्य होते. यावर दोस्त राष्ट्रांचे एक कमांडो पथक मेजर रॉय फ्राँकलिन यांच्या नेतृत्त्वाखाली नेव्हरॅान येथे घुसविण्यात येते. येथे कॅप्टन किथ मिलरी (ग्रेगरी पेक) कर्नल आंद्रे स्टावरो (अँथनी क्वीन), फ्रँकलिनचा खास मित्र कार्पोरल मिरल (डेव्हिड निवेन) हे अनेक खटपटी करून स्थानिक गुप्तहेरांच्या मदतीने किल्ल्यात प्रवेश करून नाझी सैनिकांची धूळधाण करून या प्रचंड तोफा उद्ध्वस्त करतात व ब्रिटनच्या लढाऊ जहाजांचा मार्ग कसा निर्विघ्न करतात हे या चित्तथरारक युद्धपटात पहावयास मिळतो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply