नवीन लेखन...

इंग्लिश स्कूलचं फॅड

The Fad of English School

गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?”
तो:”कशाला म्हंजे…? पोरग टाकलं की शाळात”
मी:”शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?”
तो:”मग ?”इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला.”
मी: “किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून.”
मी:”आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?”
तो:”कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू”
मी:” पोराचं काय वय?”
तो:” चौथं लागलं असलं बघा आवंदा.”
मी: “अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं ”
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?”
मी:”गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?”
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे”
मी:”का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? ”
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या”
मी:”आता हयो निल्या कोण ?”
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!”
मी: “मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?”
तो: ” पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत.”
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही .”
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू ”
मी: “इंग्लीश स्कूल काय सायबाचा कारखाना काय ?”
तो: कारखाना असतो व्हय कुठं ? तुम्ही मही मज्जाच घ्याताव की सर ?”
मी: नाय बुवा तुझी कशाला मज्जा करू. सारं विचारवंत म्हणत्यात मातृ

माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ….!!

परशुराम सोंडगे,
पाटोदा बीड
9673400928

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..