प्रसिद्ध प्रख्यात गणिती आणि भूगोलतज्ज्ञ मर्केटर गेरहार्ट यांचा जन्म ५ मार्च १५१२ रोजी झाला.
मर्केटर गेरहार्ट यांना नकाशा शास्त्राचे जनक मानले जाते. टॉलेमी यांच्या जगाच्या नकाशाची मदत घेऊन १५३८ मध्ये मर्केटर गेरहार्ट यांनी जगाचा नकाशा तयार केला. १५४१ मध्ये १.३० मीटर परिघाचा पृथ्वीचा गोल करून त्याच धर्तीवर १५५१ मध्ये गेरहार्ट यांनी तारामंडळाचा गोल बनविला. आधुनिक युरोपचा नकाशा तयार करणारे हे मर्केटर गेरहार्ट. ग्रहणे आणि खगोलशास्त्राच्या आधाराने जगाच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास लिहिण्याचे मर्केटर गेरहार्ट यांनी ठरविले आणि त्याला नाव दिले ॲटलास. यामुळेच पुढे नकाशासंग्रहालाच लोक ॲटलास म्हणू लागले. जगातील सर्व हवाईमार्ग व जलमार्ग दाखविणाऱ्या नकाशाकरिता वापरले जाणारे मर्केटर प्रक्षेपणही त्यांची भूगोलशास्त्राला देणगी आहे.
मर्केटर गेरहार्ट यांचे २ डिसेंबर १५९४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply