उमर खय्याम यांचा जन्म १८ मे १०४८ रोजी झाला.
उमर खय्याम यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली अरबी वेशातला दाढीवाला कवी, शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्राद्वारे झालेला असतो. तंबू बांधणीचे काम करणाऱ्या पर्शियातील एका कुटुंबात उमर खय्याम यांचा जन्म झाला होता. अरबेक सूत्रांनुसार ओमर यांचे पूर्ण नवं हे अबुल फाथ ओमर इब्न इब्राहिम अल खय्याम असे असले तरी आपल्या गणित खगोलशास्त्र व कविता या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते उमर खय्याम म्हणूनच ओळखले जातात. उमर खय्याम यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ हा गणिती शोधांसाठी समर्पित केलं होतं. गणिततज्ञ म्हणून काम करत असताना,क्युबिक समीकरणांचे वर्गीकरण आणि उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेल्या पद्धतीने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भौमितिक पद्धतीने कोनिक्सचा व छेदबिंदूंचा अभ्यास करून तयार केलेली ही सोप्पी पद्धत आकलनात येऊ शकेल असा पहिला शोध मानला जातो. यासोबतच समांतर विश्वाच्या अस्तित्वाबद्दलचे त्यांचे सिद्धांत देखील वैज्ञानिकांकडून अभ्यासले जातात.
एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. यापैकी ‘रुबायत ऑफ ओमर खय्याम’ हा एडवर्ड फित्झगेराल्ड याने अनुवाद केलेला कवितांचा संग्रह पश्चिमेकडील देशांमध्ये यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. तल्लख बुद्धीचे ओमर हे तद्कालीन खोरोसन प्रांतातील मलिक शाह पहिल्या याच्या साम्राज्यात सल्लागार व ज्योतिषी म्हणून काम करत होते. याशिवाय ओमर खय्यम यांनी बीजगणितात देखील मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते. आपल्या सांगीतिक व गणित विषयातील शोधांवर आधारित प्रॉब्लेम्स ऑफ अरीथमेटिक हे पुस्तक ओमर यांनी लिहिले आहे.
उमर खय्याम हे अरब राजवटीतील सर्वोत्कृष्ट गणितज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध सौरवर्षाचे कॅलेंडर आणि जलाली कॅलेंडरचा शोध लावला. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी ज्योतिषशास्त्रातही अनेक शोध लावले होते. त्यांच्या रुबायांचा भावानुभव ‘श्रीगुरुकरुणामृत’ या नावे प्रसिद्ध झाल्याचे वाचून वाचकांची उत्सुकता निश्चितच चाळवेल.
व्यंकटेश माधव दातार यांनी पुस्तकाची जन्मकथा अशी सांगितली आहे की, ‘गुरुमाऊली ब्रह्मानंद मायींनी १९१६ डिसेंबरमध्ये एका उत्सवात उमर खय्यामच्या रुबायांचा मराठीत अनुवाद करून त्यातील तत्त्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानाशी समान आहे हे स्पष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार दातार यांनी हा ग्रंथ रचला. म्हणून त्याचे नाव ‘गुरुकरुणामृत.’ तसेच मराठीत उमर खय्यामच्या ५२४ रुबायांचा अनुवाद माधव ज्युलिअन यांनी केला आहे. ज्युलिअन यांनी रुबायांचे जे वर्गीकरण केले आहे त्यापेक्षा वेगळे वर्गीकरण दातार करतात व त्यातील अर्थाची भिन्न प्रकृती व्यवस्थित मांडतात.
उमर खय्याम यांचे ४ डिसेंबर ११३१ रोजी निधन झाले. त्यांना खोरासान येथील खय्याम गार्डन मध्ये पर्शियन विधींप्रमाणे पुरण्यात आले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply