‘जगाचा पोशिंदा जगला पाहिजे..!!’
‘सर, कशी वाटली स्लोगन..??’
‘उत्तम आहे.. यात करूणा, पॅथाॅस, इमोशनल अपील सगळं काही आहे.. ही फायनल करा..’
‘येस सर.. सर अजून काही रिक्वायरमेंट..??’
‘हो, सोशल मिडीयासाठी दोन तीन लेख लिहून घ्या, ज्यात करूणा, पॅथाॅस, इमोशनल अपील हे सगळं असेल.. एखाद्या लेखात आकडेवारी वगैरे द्या म्हणजे लेख अभ्यासपूर्ण वाटतो आणि चटकन विश्वास बसतो..’
‘येस सर.. अजून काही..??’
‘आहे ना.. वरनं रिक्वायरमेन्ट आली आहे.. साधारण २० एक हजार लिटर दूध तयार ठेवा ओतून देण्यासाठी, आंबे, फळं, टोमॅटो वगैरे पण लागतील बऱ्याच प्रमाणात.. हो, आणि हिरव्या पालेभाज्या पण आणा.. काय आहे, लाल आणि हिरव्याचं मातीबरोबरचं काॅंबीनेशन चांगलं दिसतं फोटो आणि व्हिडीओमधे.. इट शूड लूक लाईक अ ‘राडा’..!’
‘सर पण शेतकरी देतील का एवढा सगळा माल वेस्ट करायला.. त्यांनीच कष्टाने पिकवलेला असतो ना तो..??’
‘ते कन्विन्स करायचं काम तुमचं आहे.. साम-दाम-दंड-भेद विसरलात का..?? काही लोक स्वत:हून तयार होतील, त्यांना एन्करेज करा, त्यांच्या न्यूज बनवा आणि दिवस-रात्र चालवा.. सोशल मिडीयावर व्हायरल करा.. म्हणजे त्यातून प्रेरणा घेऊन बाकीचेही तयार होतील.. जे नाही तयार होणार त्यांना ‘बाकीचे’ उपाय वापरा..!’
‘सर, मागण्यांचे फ्लेक्स बनवावे लागतील, त्याचा मॅटर..!!??’
‘मॅटर मागचाच वापरा.. ड्राफ्टींग थोडं चेंज करा.. कारण मुद्दे तेच आहेत.. फक्त नेत्यांची नावं बदला.. आणि हे सगळं गेल्या २-३-४ वर्षांत बिघडलंय हे हायलाईट करा.. मोठ्या नेत्यांचे पाठींबे मी प्लॅन केलेत.. ते वन बाय वन येतील.. त्याच्या न्यूज त्या-त्या वेळी कराव्या लागतील, त्या तयारीत रहा..’
‘ओके सर, असं कॅंपेन डिझाईन करतो की शेतकऱ्यांचे सगळे प्राॅब्लेम संपलेच पाहीजेत..!!’
‘हॅल्लो..!! डोक्यावर पडले आहात का..?? सगळे प्रश्न संपले तर तुम्ही आम्ही काय खाणार..?? तुम्हाला कॅंपेन यशस्वी करायला हायर केलंय.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आपला काहीही संबंध नाही.. कॅंपेन मोठं आणि यशस्वी झालं पाहिजे, एवढंच टार्गेट ठेवा..!’
‘पण सर, ज्यांना यायचं नसेल त्यांचं काय करायचं..?? कारण मालाची रिक्वायरमेंट मोठी आहे यंदा..’
‘फार काही करू नका.. गाड्या आडवाव्या लागल्या तर आडवा, आणि जे आडवायला/फोडायला जातील त्यांना भगवे टिळे लावून जायला सांगा.. फक्त त्यांच्या न्यूज होणार नाहीत हे बघा.. कारण सर्व शेतकरी बांधवांचा याला पाठींबा आहे हे बाहेर पोहोचवायचं आहे..!!
‘ग्रेट सर, मी लागतो कामाला…!!’
‘हे काम नीट झालं तर २०१९ चं फुल्ल कॅंपेन आपल्याला मिळेल.. त्यामुळे जोरदार झालं पाहीजे सगळं..!!
‘त्याची तुम्ही काळजीच करू नका सर..’
‘आणि हो, एक महत्वाचं सांगायचं राहिलं.. एखाद दुसऱ्या ‘सॅक्रीफाईस’ची ही तयारी ठेवा.. इनकेस..!लागलंच तर..!! वरनं आॅर्डर आली आणि आपली तयारी नाही असं व्हायला नको.. नाही का..!!??’
‘शुअर सर.. एक दोघंजण बघून ठेवलेत मी.. होऊन जाईल काम.. आजंच कॅम्पेन लाॅन्च करतो वीथ स्लोगन…
‘जगाचा पोशिंदा जगला पाहीजे..!!’
श्री केदार दिवेकर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.
Leave a Reply