नवीन लेखन...

उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.

चार्ल्स रॉबर्ट डार्विनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात झाला.  १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.

१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, ‘बळी तो कान पिळी’, ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले.

वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सयफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला.

चार्ल्स डार्विनचे १९ एप्रिल १८८२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..