नवीन लेखन...

शरयू नदीच्या भावना….

।।जय श्रीराम ।।

अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ? 


…..  शरयू नदीचं पाणी शहारलं . डहुळलं .
आणि क्षणार्धात थिजलं .
प्रवाह थांबलाच जणू.
तीरावर कुणाचं तरी बोलणं चालू होतं,

“…यही दाह संस्कार हुआ था । जिनपर गोलियां चलायी …”
शरयुचं पाणी त्या वाक्यानं पुन्हा पेटून उठलं आणि वास्तवाची जाणीव झाल्यावर थिजलं .
तिला वाटलं ,आपला इतिहास , परंपरा , संस्कृती सगळं काही दूषित झालंय .
…आपल्या तीरावर वसलेली अयोध्या .
मनुनं निर्माण केलेली. देखणी . कलात्मक . समृद्ध परंपरेची प्रतीक असणारी अयोध्या .
श्रीरामाची अयोध्या .
श्रीरामाचं जन्मस्थान असणारी अयोध्या .
अजरामर कर्तृत्वाची पताका खांद्यावर मिरवणारी अयोध्या .

—काळ बदलत होता .
माणसांच्या वृत्ती बदलत होत्या .
आपमतलबी आणि आत्मघातकी फंदफितुरीनं अयोध्येवर घाव पडला .डाव साधला परकीय आक्रमकांनी .
श्रीरामांचं जन्मस्थान उद्ध्वस्त झालं .
कोट्यवधी भारतीयांच्या छाताडावर अत्यंत निर्दयपणानं घाव घातला . न पुसता येणारा .
निष्कलंक अयोध्या कलंकित झाली .
…शरयू तेव्हापासून आक्रंदत होती.
कोसळत होती मनानं.
कोलमडत होती शरीरानं.
सगळ्या जुन्या आठवणी उराशी कवटाळून शोध घेत होती , श्रीरामाचा.
श्रीरामांच्या गर्भागाराचा .
आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या सगळ्या वास्तूंचा आणि वस्तूंचा .
पण सगळं संपल्यागत झालं होतं.
षंढ , भोंगळ , अगतिक , गुलामी वृत्तीच्या बधीर प्रजेला काही वाटत नव्हतं .
ना श्रद्धा ,ना आत्मविश्वास,
ना लाज , ना शरम,
ना अपमान , ना अभिमान.
सगळे बधीर .
गलितगात्र.
राष्ट्रीय मानबिंदूंबद्दल ना काही देणंघेणं , ना कसलं सोयरसुतक .

…पण कुठेतरी राष्ट्रीयत्वाची भावना, अस्मिता जागी होत होती.
देशभर त्याचे पडसाद उमटू लागले होते.
राष्ट्रभक्त सरसावले होते, म्हणत होते,
परकीयांची पुसुनी टाकू येथील नावनिशाणी

शरयू आनंदित झाली.
आणि …आणि…

आणि सहा डिसेंम्बरला बाबरी पडली !

ही वार्ता सुखद होती.
श्रीराम जन्मभूमी अखेर जगासमोर आली होती.
शरयुचं पाणी आनंदानं न्हालं.
तिनं रामलल्लाचं दुरून का होईना दर्शन घेतलं.
ती रोमांचित झाली.
उत्तेजित झाली.
अवघ जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं तिला.

पण हाय …
ते सगळं क्षणभंगुर ठरलं होतं.

— पुढच्या काही दिवसात भयंकर काही घडू लागलं होतं .

तिला कल्पनाही नव्हती,
आपल्याच देशात त्यावेळचे सत्ताधीश , आपल्याच प्रजेला गोळ्या घालून अत्यंत निर्घृणपणे ठार मारतील ,
स्वप्नातही असं वाटलं नव्हतं.

पण दिवसा प्रखर सूर्याच्या साक्षीनं आणि रात्री चंद्राच्या साक्षीनं, केंद्रामधल्या आणि उत्तरप्रदेश मधल्या जुलमी सत्ताधीशांच्या हुकुमाचे बंदे, शरयुच्या तीरावर हुतात्म्यांची प्रेतं जाळू लागले आणि नंतर नंतर प्रेतं तशीच पाण्यात टाकू लागले.

शरायुचे अश्रू अनावर झाले होते , आत्ताही आणि तेव्हाही …
तिचा आकांत गहिरा झाला होता ,
तिचं दुःख आसमन्त भेदून गेलं होतं , त्यावेळी …

…शरयू रडतेच आहे आज, पण आनंदानं !
तिला वाटतंय राम लल्लाचं भव्य मंदिर याची देही याची डोळा आता नक्की होईल .
तिला वाटतंय , हौतात्म्य वाया गेलेलं नाही .
पण शरयुची अस्वस्थता तरीही वाढतेच आहे .पण ती औत्सुक्याने.
तिला वाटतंय , हिंदुस्थानातील युगपुरुषाला , कोट्यवधी समाजपुरुषांनी बळ दिलंय .
आता अयोध्येला गतवैभव प्राप्त होईल.
रामलल्लाचं भव्य मंदिर निर्माण होईल .
आणि मंदिरासाठी बलिदान करणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभेल .
— शरयू नदी पुनःपुन्हा शहारली.

आणि उरात साठवलेल्या कारसेवकांच्या रक्ताच्या , मृत देहांच्या आठवणीनं उदास झाली .
भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली ;

” बाळांनो , तुम्ही नाहीत या जगात हे मंदिर पाहायला ,ज्याचा तुम्ही ध्यास घेतला होता .अयोध्येतील ज्या ज्या गल्लीबोळातून तुमचे मृतदेह विटंबना करीत फरफटत आणून माझ्या कुशीत नराधमांनी फेकले , त्या गल्लीतील रक्त लांच्छित धूळ पावन झाली आहे . तिथून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व रामभक्तांना तुमच्या बलिदानाची आठवण सदैव राहील !!!.”

— आता मात्र शरयुचं पाणी संथ होऊन वाहू लागलं .भव्य राममंदिराचं स्वप्न तिच्या तरंगातरंगातून दृग्गोचर होऊ लागलं होतं .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी

( नावासह शेअर करायलाच हवी ही कथा . जय श्रीराम ।)

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..