‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपट २१६ मिनिटांचा आहे. (म्हणजे तो आपल्या शोले या सिनेमापेक्षाही लांबीने मोठा आहे.) या भव्यदिव्य चित्रपटाचा दिग्दर्शक ‘डेव्हिड लीन’ होता. १९६२ सालीतील या चित्रपटाला ऑस्करसाठी १० नामांकनं होती आणि त्याला ७ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि डेव्हिड लीनला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाने स्टीव्हन स्पीलबर्गपासून ते रिडली स्कॉट (२०१२ साली निर्मिलेल्या ‘प्रोमेथियस’ या गाजलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक) पर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना प्रभावित केलं आहे.
टी. ई. लॉरेन्स- ज्याच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवला गेला आहे, ही एक अतिशय धाडसी व्यक्ती. कवी, अभ्यासक आणि योद्धा अशा विविध प्रकारच्या पलूंनी त्याचं सुरस आयुष्य भरलेलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिश सरकारचा एक सन्याधिकारी म्हणून तो मध्यपूर्वेत कार्यरत होता आणि तुर्कीविरुद्धच्या अरबांच्या बंडात त्यानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लॉरेन्स हे अतिशय गूढ आणि अनाकलनीय व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्यात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना आणि अनेक विरोधाभासांनी भर घातली होती. पीटरने हे सर्व परस्परविरोधी पैलू आणि त्यांच्या छटा आपल्या भूमिकेतून अत्यंत सुंदर रितीने आणि समर्थपणे सादर केल्या आहेत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply