नवीन लेखन...

‘सांदण हॉटेल’ चा पहिला वर्धापनदिन

१४ फेब्रुवारी २०२१ रोजी करोनाचे संकट हळू हळू दूर होत असताना पुण्याच्या कोथरूड भागात आनंद गोखले व समीर मराठे या पुण्यातील दोन युवा केटरिंग व्यवसायिकांनी (आनंद गोखले हे माझे मेव्हणे आहेत.) सांदण नावाचे देखणे मराठी शुद्ध शाकाहारी पदार्थांचे हॉटेल चालू केले.

आल्हाददायक वातावरण.. भिंतीवर लावलेली आपली परंपरा सांगणारी चित्रे.. काचेवरची डिझाईन आपल्या पारंपारिक रांगोळीची.. ओपन किचन.. आदबशीर स्टाफ.. गरमागरम जेवण.. आणि अस्सल मराठी चवीचा सुवास ही सांदणची खासियत.. जर तुमचा कोकणाशी संबध असेल सांदण हे तुमच्या कोकणातल्या आठवणी जाग्या करेल. जर तुमचा कोकणाशी काही संबंध नसेल तर अस्सल महाराष्ट्रातील अनेक हटके शाकाहारी पदार्थांशी सांदण तुमची गाठ बांधून देते.
येथे तुमचे सूपाचे प्रकार मिळणार नाहीत, येथे मिळेल गरमागरम कळण, त्याचबरोबर मिळेल ताज्या नारळाच्या दुधात बनवलेली उत्तम सोलकढी.

अनेक अस्सल मराठी पदार्थ सांदण मध्ये गेल्यावर स्टार्टर मध्ये मिळतात. उदा.कोथिंबीर वडी. वरुन तीळ लावून तळलेली. बाहेरून कुरकुरीत आतून लुसलुशीत. तसेच पुडाची वडी. त्याच्याबरोबर उकडलेले कडधान्य..मूग, शेंगदाणे, हरभरे. आणि त्याबरोबर खजूराची चटणी.

मेन कोर्स मध्ये सांदण प्रसिद्ध आहे ते ओल्या काजूची उसळ आणि घावने, मऊ भाकरी आणि नारळ घालून केलेली फणसाची भाजी व शहाळ्याच्या भाजी. ओल्या नारळाच्या वाटणात केलेली ही शहाळ्याच्या भाजी, त्यात अप्रतिम शिजलेले शहाळ्याचे लांबट काप मस्त.. नागपुरी वडाभातासाठी पण सांदण प्रसिद्ध झाले आहे. शेवटी गोड साठी सांदणची स्पेशालिटी म्हणजे फणसाचे आणि आंब्याचे सांदण, नारळाच्या दुधातल्या शेवया. सांदण मध्ये अजूनही मटार वडे, अंबोळी, घारगे,जळगावी वांग्याचे भरीत, उकड,अंबिल,वळवले,कुरकुरी भेंडी, भाजणीचे थालीपीठ, सुरणाचे व वांग्याचे काप,जिरी मिरी राइस, कटवडा,मिसळ असे जवळपास ७० हून अधिक पदार्थ मेनू कार्डवर आहेत. सांदण नेहमी आपल्या मराठी सणांना (संक्रात,श्रावण, दिवाळी,दसरा,) वेगळे पदार्थ देऊन आपले वेगळेपण जपत असते. विष्णू मनोहर यांनी एका मुलाखतीत सांदणचे कौतुक करताना मराठी पदार्थाला श्रीमंती थाट दिल्याचे म्हणले होते. पुण्यात बसून कोकणाची, नागपूरची व इतर महाराष्ट्रातील पदार्थांची चव चाखायची असेल तर फॅमिलीला घेऊन ‘सांदणला’ भेट नक्की द्या.. मात्र गर्दी असल्यास वैतागू नका, संयम बाळगा आणि प्रतीक्षा करा.

सध्याच्या पंजाबी आणि साऊथ इंडियन रेस्टॉरंटच्या गर्दीत अभिमानाने आपली मराठमोळी चव जपणाऱ्या ‘सांदण’ला पहिल्या वर्धापन दिना निमीत्त शुभेच्छा.

पत्ता: सांदण, दिगंबर हॉलच्या वर, भारती विद्यापीठ जवळ, पौड रोड. कोथरूड पुणे.

संपर्क: 76202 89680.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..