नवीन लेखन...

पहिल्या आयपीएस महिला अधिकारी डॉ. किरण बेदी

प्रोफेसर म्हणून करिअरची सुरवात करून भारतीय प्रशासकीय सेवेची सर्वोच्च परीक्षा वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी उत्तीर्ण होऊन आयपीएसमध्ये दाखल होणारी पहिली भारतीय महिला किरण बेदी अशी ओळख आहे. त्यांचा जन्म ९ जून १९४९ रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. माहेरच्या किरण पेशावरिया म्हणजेच किरण बेदी. किरण बेदी यांना बालपणी टेनिस खेळ खूप आवडायचा. किरण बेदी या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनिअर लॉन टेनिस खेळाडू होत्या. किरण बेदी यांनी अमृतसरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर चंदिगड येथील पंजाब विद्यापिठातून सोशल सायन्स मध्ये मास्टर्स पूर्ण केले. १९८८ साली दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर सोशल सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवली. यावेळी त्यांचा विषय ‘ड्रग्ज, अब्युज ॲ‍ण्ड डोमॅस्टीक व्हायलंस’ हा होता. त्या नंतर त्यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर वुमनमध्ये पोलिटिकल सायन्स च्या लेक्टरर म्हणून नोकरीला सुरवात केली. १६ जुलै १९७२ रोजी भारतीय पोलीस दलात ‘पहिला महिला अधिकारी’ म्हणून प्रवेश केलेल्या किरण बेदींनी १९७३ च्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व केले होते. अनेक पोलीस शौर्य पदकांबरोबर राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळवले. एशिया रिजन ॲ‍वॉर्ड, जवाहरलाल नेहरू सॉलिडॅरिटी ॲ‍वॉर्ड, रेमन मॅगसेसे ॲ‍लवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्रे स्वीकारण्याची हिंमत किरण बेदींनी दाखवली आहे. किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी आहे. किरण यांच्या मुलीचे नाव साइना असून ती सामाजिक कार्यात आहे. ती एक एनजीओही चालवते. तिने एका कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने किरण बेदी यांच्या पुस्तकावर ‘गलती किसकी है’ ही सिरिअल काढली होती. टीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो “आप की कचेरी” मध्ये किरण बेदी यांनी न्यायाधीश आणि ॲ‍ंकरची भूमिका बजावली. यात रिअल लाईफ भांडणांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असे. त्यांनी नवज्योती दिल्ली पोलिस फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्यानंतर २००७ साली या संस्थेचे नामकरण नवज्योती इंडिया फाऊंडेशन असे करण्यात आले.

ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन यांनी किरण बेदी यांच्या जिवनावर Yes Madam, Sir हा चित्रपट तयार केला आहे. २००६ मध्ये नॉर्वेची एमपॉवर फिल्म ॲ‍ण्ड मीडिया आणि फिल्ममेकर ओयस्टीन राक्केनेस यांनी त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी काढली होती. Carve Your Destiny या चित्रपटातही किरण बेदी झळकल्या होत्या. २००९ मध्ये Kannadada Kiran Bedi हा कन्नड भाषेत त्यांच्या आयुष्यावर तयार केलेला फिक्शनल चित्रपट आला होता.

I dare!: Kiran Bedi : a biography by Parmesh Dangwal आणि Kiran Bedi, the kindly baton by Meenakshi Saxena या किरण बेदी यांच्या बायोग्राफी प्रसिद्ध झाल्या आहेत.

किरण बेदी या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या होत्या व त्यानंतर त्या भाजपमध्ये सामील झाल्या. त्यांचे नेहमीच आयुष्य वादांनी भरलेले राहिले. त्या जेवढ्या लोकप्रिय झाल्या, तेवढेच त्या वादात अडकत गेल्या. सध्या किरण बेदी या पॉंडेचारीच्या नायब राज्यपाल आहेत.

किरण बेदी यांची वेबसाईट: www.kiranbedi.com

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..