नवीन लेखन...

‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रथम प्रयोग

मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग ‘किर्लोस्कर संगीत मंडळींकडून’ सादर झाला. त्या वेळी लोकमान्य तिळक यांना देखील हे नाटक आवडले होते.

परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका’ यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून ‘मानापमान’ सुरू होते व नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली ‘भामिनी’ ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’अशी ईर्शा यातून दिसून येते.

श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.

त्याकाळी लोकप्रिय झालेली या नाटकातील पदेही आजही खूप लोकप्रिय आहेत. ‘नमन नटवरा’ या नांदीपासून ‘धनी मी पती वरीन कशी अधना’, ‘या नवल नयनोत्सवा’ ‘टकमक पाही सूर्यरजनी मूख’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘दे हाता शरणागता’, ‘नाही मी बोलत’, ‘शुरा मी वंदिले’, ‘प्रेमभावे जीव जगीया’, ‘प्रेम सेवा शरण’, ‘रवी मी’, ‘माता दिसली’, ‘युवती मना दारुण रण’, ‘मला मदन भासे’, अशी जवळजवळ पंचवीसहून अधिक गाणी दीनानाथ मंगेशकर, आशा भोसले, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात आजही लोकप्रियता टिकवून आहेत.

इतके वर्ष एखादे नाटक सादर होणे आणि त्याच्याविषयाची महती अजूनही टिकणे, या मागे नाटककाराची प्रतिमा आढळून येते. कथानकं मिळवून ती फुलवणं आणि त्यामध्ये समाजातील परिस्थितीचे प्रतिबिंब दाखविणे, असे वैशिष्टय़ आहे. म्हणून १०७ वर्षांनंतरही ‘मानापमान’ सारखे नाटक ताजेतवाने वाटते. शंभर वर्षां हून पूर्वी हे नाटक लिहिलं गेलेले हे नाटक राहुल देशपांडे यांनी पुन्हा रंगभूमीवर आणले होते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on ‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रथम प्रयोग

  1. या नवनवल नयनोत्सवा गाण्याची पार्श्र्वभूमी काय? नयनांसाठी कोणता उत्सव आहे धैर्यधराला अपेक्षित अथवा प्रसंग काय आहे?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..