स्टीव्ह आणि मार्कचा जन्म २ जून १९६५ रोजी झाला.
स्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे.
स्टीव्ह वॉने १६८ कसोटी सामन्यांत ५१.०६च्या सरासरीने १०, ९२७ आणि ३२५ वनडेत ३२.६०च्या सरासरीने ७५६९ धावा केल्या. ३२ कसोटी शतके त्याच्या नावावर आहेत. स्टीव्ह वॉचे भारतप्रेम सर्वश्रुत आहे. स्टीव्ह वॉ नंतर पाच वर्षानी कसोटी पदार्पण केलेला मार्क वॉ ‘स्ट्रोकप्लेयर’ म्हणून प्रसिद्ध होता. त्याने १२८ कसोटीत ४१.८१च्या सरासरीने ८०२९ आणि २४४ वनडेत ३९.३५च्या सरासरीने ८५०० धावा फटकावल्या. कसोटीत २० आणि वनडेत १८ शतके मार्क वॉने ठोकली. प्रभावी ऑफब्रेक मा-याने त्याने कसोटी आणि वनडेत अनुक्रमे ५९ आणि ८५ विकेट्सही घेतल्या.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
संदर्भ. इंटरनेट.
Leave a Reply