आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.
जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी झाला. जॉन अब्राहम जेव्हा २२ वर्षांचा होता तेव्हा त्याने हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा ‘रॉकी 4’ पाहिला. जॉन यावेळी खुप इंस्पायर झाला आणि त्याने स्वतःला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो मॉडलिंग करु लागला आणि १९९९ मध्ये ग्लँडरेग्स मॅनहंट कॉन्टेस्ट जिंकला. यानंतर त्याला अनेक जाहिराती आणि म्यूझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर २००३ मध्ये ‘जिस्म’ या सिनेमाद्वारे त्याने फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. १५ वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये जॉन अब्राहमने जवळपास ४५ चित्रपटात काम केलेय. परंतू त्याचे जास्तीत जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकलेले नाही. तसेच जॉन अनेक कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेला आहे.
एकेकाळी जॉन अब्राहम अभिनेत्री बिपाशा बासूसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघं दिर्घकाळ लिव्ह-इनमध्ये होते. परंतू बिपाशाला डेट करताना तो प्रिया रुंचललाही डेट करत होता. यामुळे बिपाशा आणि जॉनचे नाते तुटले. जॉन आज बँकर असलेल्या प्रिया रुंचालसोबत आनंदात वैवाहिक आयुष्य जगत आहे. बॉलीवूडचा एंग्री यंग मेन म्हणून ओळख असलेला जॉन अब्राहम मराठीत पाऊल टाकत आहे.
जॉन अब्राहम महागड्या गाड्या आणि आलिशान कारचा शौकीन आहे. त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये राजपुताना लाइट फुट, डुकाती डिवेल, कावासाकी निंजा, हायाबुसा, महिंद्रा मोजो या महागड्या आणि स्टायलिश गाड्यांचे कलेक्शन आहे. इतकेच नाही त्याच्याजवळ 2 कोटींची निसान जीटी-आर आणि 3.46 कोटींची लॅम्बोर्गिनी गैलार्डो कार आहे.
जॉन अब्राहम यांने सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपट निर्मिती केली आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply