नवीन लेखन...

जीवनावर प्रभाव टाकणारे चार घटक

आज आपण आपले जीवन उदात्त बनवण्याच्या चार मौल्यवान घटकांवर विचार करूया. हे घटक आपल्या नियतीला दिव्यत्वाच्या मार्गावर खचितच नेतील. त्याच्या पूर्तीसाठीच हा मानवी जन्म आपणांस बहाल करण्यात आला आहे. पृथ्वीवरील मानवाच्या आगमनामागचे जे ज्ञात पैलू आहेत- ज्ञान, आकलन, बुद्धिमत्ता, समज, परिपक्वता, ते सारे साध्य होण्यासाठी हे चार घटक महत्वाचे ठरतात. हा “आत्मज्ञानाचा ” मार्ग आहे.

प्रथम घटक  – परमेश्वराने दिलेली अफाट शक्ती ! हीच शक्ती जागरूकता, सामर्थ्य, अंतःप्रकाश आणू शकते. यालाच शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म म्हणता येईल. ब्रह्माचा पहिला अवतार वैश्विक स्पंदनांमधून झाला (आद्य स्पंदन )  – ” प्रणव (ओम )” महर्षी पतंजलींनी हा सर्वप्रथम ओळखला. जगातील सर्व नामांचा हा उदगाता आहे. वारंवार संतांनी त्याचा उच्चार केलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे – ” तुम्हांपाशीं नाम असेल तर मग भिता कशाला आणि कोणाला ? ” हे नामच तुमचे स्नेही असते. त्याच्याच मदतीने तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता.

द्वितीय घटक–  म्हणजे मनाद्वारे  देवाचे स्मरण करणे(मानसपूजा). जेव्हा जीभ नाम उच्चारत असते, तेव्हा मनाला परमात्म्याचे स्मरण होत असते. वारंवार संतांनी आपले जीवन गौरवशाली ध्येयाकडे नेण्याच्या या एका मार्गावर जोर दिला आहे – आपली चेतना त्या भव्य आणि उदात्त सत्यावर  केंद्रित करणे – नामस्मरण, नामस्मरण !

तिसरा घटक – तुमच्या प्रत्येक विचारात, कृतीत , वर्तनात तुम्ही कोणते भाव आणता? व्यक्त करता? त्याचा कोणता अर्थ तुम्हास अभिप्रेत असतो? तुमच्यासाठी तेच तेच कंटाळवाणे असते कां, बिनमहत्वाचे असते कां, सवय म्हणून असते कां? किंवा ते  “उदात्त, दिव्य, अध्यात्मिक असे काहीतरी असते कां ? तुम्ही जगत असता, खात पीत असता, हिंडत फिरत असता तेंव्हा काही वेगळी अनुभूती जाणवते कां ? तुमच्या दैनंदिन व्यवहारांमधून कोणता भाव प्रकट असतो? हा भाव पूर्णतया तुमच्या हातात असतो. कारण हा भाव तुमचा खजिना असतो, ओळख असते, तुमचा प्रदेश असतो, तुमची मक्तेदारी असते. या आतील राजसत्तेवर तुमचा पूर्ण अंमल असतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे अस्सल जीवनानुभवांवर जगत असाल तर हे आतील भावविश्व तुमची वाटचाल सुलभ करते.

चौथा घटक – हे सगळं विश्व पवित्र आहे, असं आपण मानता कां ? धर्म ग्रंथांकडे एक नजर जरी टाकली तर तुमच्या ध्यानात येईल की खरा साधक विश्वातील व्यवहारांकडे कोणत्या भावनेने बघत असतो. हे विश्व महान आहे, दिव्य आहे. एकदा हे पटलं की मग आपली दृष्टी, भाव बदलतो. सगळं उदात्त आहे, अध्यात्मिक आहे, हे जाणवलं की आपली प्रत्येक कृती (शारीरिक, मानसिक, वाचिक, भावनिक) आपोआप उदात्त होत जाते. आपण जे ऐकतो, पाहतो, ज्याचा आस्वाद घेतो, ज्याला स्पर्शतो, ज्याच्याबद्दल विचार करतो ती आपली इष्टदेवता बनते.

ही चार प्रभावी तत्वे तुमचे अध्यात्मिक जीवन बदलून टाकतील, तुम्हाला योग्य दिशा दाखवतील, मग विश्वातील कोणतीही शक्ती तुमची प्रगती रोखू शकत नाही. पावलांशी स्वर्गाची चावी असताना, अनावश्यक प्रश्न, शंका यांना मनात थारा कां द्यायचा? या घटकांच्या मदतीने तुम्ही कशावरही मात करू शकाल.

— डॉ नितीन ह देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..