महान स्वातंत्र सेनानी कित्तूर राणी चेन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव येथील काकटी या छोट्या खेड्यात झाला.
राणी चेन्नम्मा यांचा जन्म लिंगायत कुटुंबात झाला. धुळप्पा देसाई गौड्ररू हे त्यांचे वडील. घोडा फेकणे, तलवार चालवणे व तिरंदाजी यात त्या प्रविण होत्या. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह देसाई कुटुंबातील राजा मल्लसराजा याच्याशी झाला. १८२४ साली राणी चेन्नम्मा यांचे पती मल्लसराजा निधन पावले. एक पुत्र व अस्थैर्य माजलेले राज्य यांची जबाबदारी राणी चेन्नम्मा यांचेवर पडली. याहुनही मोठे दुर्भाग्य म्हणजे १८२४ मधेच त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला.
इंग्रजांपासुन राज्य वाचवणे ही फार मोठी जबाबदारी राणी चेन्नम्मा यांचेवर येऊन पडली. तात्काळ त्यानी राजधानी डोंगरभागात हलवली. लगेचच १८२४ मध्येच त्यानी शिवलिंगपप्पा नावाचा पुत्र दत्तक म्हणून घेतला व त्यास राज्याचा उत्तराधिकारी बनवला. तात्कालीन ब्रिटीश अधिकारी डलहौशी याने शिवलिंगप्पा नायक याची राज्याचा वारसदार म्हणून हकलपट्टी करण्याचे आदेश दिले परंतू त्यात त्याला अपयश आले. जर एखाद्या स्वतंत्र राज्याचा शासक निधन पावला आणि राज्याला वारस नसेल, तर दत्तक पुत्र वारस म्हणून चालनार नाही व ते राज्य ब्रिटीश सरकार खालसा करणार असा तो प्रकार होता.
कित्तुरचे राज्य हे धारवाड जिल्ह्याच्या अमला खाली येत होत. St john हा त्यावेळी धारवाडचा गव्हर्नर तर चॅप्लीन हा कमिशनर होता. नविन शासक म्हणून दोघानीही कित्तूर राज्यास ब्रिटीश शासन स्विकारण्याची सुचना केली.
राणी चेन्नम्मा यानी माउंटस्टुअर्ट एल्फिस्टन या बॉम्बे प्रेसिडेंसीच्या लेफ्टनंट गवर्नरला पत्र लिहून अर्जी कळवली परंतू माउंट एल्फिस्टनने तो अर्ज धुडकावून लावला व युद्धाला निमित्त झाले.
इंग्रजांनी कित्तुरचा खजिना आणि दागिने जे दीड कोट रूपये इतक्य किमतीचे होते ते जप्त करण्याचा प्रयत्न केला, मद्रास नेटिव हॉर्स अर्टेलेरीच्या तिसर्या तुकडीने २०७९७ सैनिक व ४३७ बंदुकधार्यांसह कित्तुरवर हल्ला चढवला. परंतू राणी चेन्नम्मा यांचे सैन्यही काही कमी नव्हते त्यानी ब्रिटिशाना चोख उत्तर दिले. ब्रिटीश सेनेचा अगदी धुव्वा उडवला. १८२४ च्या ऑक्टोबरात चढवलेल्या हल्ल्यात ब्रिटीश सेनेचे भारी नुकसान झाले. तसेच st john thackery हा गवर्नर व एक राजकीय प्रतिनिधी मारला गेला. वॉल्टर इलियट व स्टिव्हनसन या अधिकार्यांना बंदी बनवण्यात आले. राणी चेन्नम्मा यानी युद्ध बंद करावे अशा अटीवर बंदी अधिकार्यांची सुटका केली. राणी चेन्नम्मा यानी अल्पवयीन सेनापती बाळप्पा यास या विजयाचे श्रेय दिले. कमिशनर चॅप्लीन ने शब्दाला जागला नाही व मोठ्या ताकतिनिशी त्याने कित्तूरवर हल्ला चढवला. दुसर्या हल्ल्यात सोलापुरचा सब कलेक्टर थॉमस मुन्रो कित्तूर सेनेच्या धारेखाली सापडून ठार झाला. राणी चेन्नम्मा यानी सेनापती सांगोला रायन्ना याच्या समेत कंबर कसली. ब्रिटीश सेनेचा नेटाने आणि धैर्याने सामना केला परंतु अखेरीस बैलहोगल किल्ल्यात राणी चेन्नम्मा पकडल्या गेल्या आणि त्याना कैदेत टाकण्यात आले. २१ फेब्रुवारी १८२९ रोजी राणी चेन्नम्मा कैदेतच मरण पावल्या. ब्रिटीश विरोधात झालेल्या युद्धात गौरीसिद्दप्पा या सेनानायकानेही राणी चेन्नम्मा याना मदत केली होती.
सांगोली रायन्ना याने १८२९ पर्यंत गनिमी काव्याने युद्ध चालूच ठेवले होते. राणी चेन्नम्मा यांचा दत्तकपुत्र शिवलिंगप्पा याला कित्तुरच्या राजपदी बसवावे ह्या उद्देशाने तो लढा देत राहिला. परंतू तोही पकडला गेला व त्याला फासावर लटकवण्यात आले. शिवलिंगप्पा यास ब्रिटिशानी कैद केले.
दर वर्षी २२ ते २४ ऑक्टोबर या वेळी राणी चेन्नम्मा यांच्या पहिल्या युद्धाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ११ सप्टेंबर २००७ रोजी प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय संसदेच्या आवारात राणी चेन्नम्मा यांचा पुतळा बसवला. बेंगलोर आणि कित्तूर येथेही राणी चेन्नम्मा यांचा अश्र्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.
बेलहोंगल येथे राणी चेन्नम्मा यांना दफन करण्यात आले तिथे त्यांची समाधी आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply