नवीन लेखन...

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्‍या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात.

रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्‍यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे स्थानिक मंत्री, नेते, शेपुट खाली घालून पक्षावर आणि श्रेष्ठींवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात. त्याचबरोबर काही जोकर आपल्या कोलांट्या उड्या मारत नेतेगिरी करत असतात. पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात.

काश्मिरपासून कन्याकुमारी, गुजरातपासून नागालैंडपर्यंत ह्या सर्कसचा तंबू असतो. मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ ग्रामीण भाषेत तमाशा बघत असतो.

सर्कसरूपी तमाशाचा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कसची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाहीचा चौथा खांब असलेले पेपरवाले, टी व्ही वाले करत असतात.

— विनोद सुर्वे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..