जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात.
रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे स्थानिक मंत्री, नेते, शेपुट खाली घालून पक्षावर आणि श्रेष्ठींवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात. त्याचबरोबर काही जोकर आपल्या कोलांट्या उड्या मारत नेतेगिरी करत असतात. पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात.
काश्मिरपासून कन्याकुमारी, गुजरातपासून नागालैंडपर्यंत ह्या सर्कसचा तंबू असतो. मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ ग्रामीण भाषेत तमाशा बघत असतो.
सर्कसरूपी तमाशाचा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कसची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाहीचा चौथा खांब असलेले पेपरवाले, टी व्ही वाले करत असतात.
— विनोद सुर्वे
Leave a Reply