संभाजी महाराजांच्या छाटलेल्या शिराला भाल्याच्या टोकावर लावून औरंगजेबाच्या छावणीत मिरवणूक निघाली होती.तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा .आदल्या दिवशी आमावस्या होती .त्यापूर्वी जवळजवळ ४० दिवस महाराजांचे अतोनात हाल केले होते.डोळे काढणे ….कानात कढत शिसे ओतणे ….कातडी सोलून काढणे …..नखे उपटणे ….आणि शेवटी शीर धडावेगळे करणे या शिक्षा शंभू राजांना दिल्या गेल्या होत्या .शीर धडावेगळे केल्यावर ते भाल्याला अडकवून त्याला लिंबाची पाने लावून ,ढोल ताशे लावून त्या शिराची मिरवणूक काढण्यात आली होती.
आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ?
खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही .याचे कारण एकाच …….. शंभू राजांच्या मृत्यूचा आम्ही साजरा करीत असलेला आनंदोत्सव ……का बरे ? शिवरायांच्या गूढमृत्यू ची शहानिशा केल्यावर संभाजी महाराजांनी तीन ब्राह्मण मंत्री असलेल्या मोरोपंत पिंगळे ,आण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना मृत्यू दंडाची शिक्षा दिली होती त्याचा हा बदला नव्हे ना ?
मी स्वतः माझ्या घरासमोर लहानपणा पासून गुढी उभारतोय देवांना गुळआणि कडू लिंबाचा पाला एकत्र करून नैवेद्य दाखवतोय पण प्रबोधनकार ठाकरे यांचे रंगो बापुजी गुप्ते यांचे चरित्र वाचल्यावर मी या विषयाचा विचार करू लागलो .
मी स्वतः कायस्थ आहे.मी जाती व्यवस्था आणि जाती नुसार उच्च नीच असा भेद पाळत नाही .गुणाला जात नसते हे मी माझ्या या पूर्वीच्या लेखातून वेळो वेळी लिहित आलो आहे.श्री शंकर अभ्यंकर ,दहीवली चे मुळे गुरुजी ,सुनील देवधर ,समर्थ रामदास स्वामी ,अमोल यादव, लीलाताई जोशी यांच्या वर लिहिलेले माझे लेख वाचा .
परंतु अनिष्ठ प्रथा आणि परंपरा यांच्या विरोधातील माझ्या लढ्याला आपली साथ हवी …….!
मग करायचे काय ????
१) मराठी नववर्षाचे स्वागत आपण करायचे पण स्वागत यात्रा काढताना छत्रपती संभाजी महाराजांची पालखी त्या शोभा यात्रेत असलीच पाहिजे.
२) नववर्षाचे स्वागत म्हणून नव्हे तर तर छत्रपती संभाजी राजांना मान वंदना म्हणून या आपल्या राजाच्या स्मरणार्थ कडू लिंबाचा पाला लावून …..त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून गुढी उभारायची .
नववर्षाचे स्वागत आणि संभाजी राजांना मानवंदना या दोन्ही गोष्टी या दिवशी झाल्या पाहिजेत.
पटत असेल तर बघा …….!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply