नवीन लेखन...

द लास्ट सीन

The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं…

40 सेकंद…20 मिनिटं…
2 तास…1 दिवस….

पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने…
6 महिने… कदाचित 2 वर्ष… ‘काय करणार हो… वाचायला वेळच मिळत नाही”…हे कारण देणाऱ्यांचे डोळे उघडणारं हे चित्र आहे. दर 84 दिवसांनी 500 रुपयांचं रिचार्ज न चुकता मारतो आपण पण दर 3 महिन्यांनी 500 रुपयांची तरी पुस्तक विकत घेतो का वाचायला..?

‘वाचाल तर वाचाल’

हे लहानपणापासून वाचत आलोय आपण पण वाचनासाठी वेळ वाचवून वाचायला वेळ काढण्याऐवजी वाचनापासून स्वतःला वाचवायचाच प्रयत्न करतो. माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खरे पुस्तक प्रेमी होते. ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकांत रमले.मृत्युपश्चात त्यांची संपत्ती म्हणजे चार कपड्यांचे जोड आणि आणि पुस्तकांची कपाटं. हीच त्यांची श्रीमंती. इंग्रजी साहित्याचा अनभिषिक्त सम्राट विल्यम शेक्सपिअर हा फार शिकलेला नव्हता पण आज त्याच्या पुस्तकांशिवाय इंग्रजी साहित्य अपूर्ण आहे.
पुस्तकांची महती सांगताना सर फ्रान्सिस बेकन म्हणतात,

“Reading makes a full man,
Conference a ready man and
Writing an exact man.”

माणसाला परिपूर्ण बनवण्याचे साधन म्हणजे वाचन. म्हणून तेच आपले खरे मित्र.तसंही भाषेचं आणि वाचण्याचं हे वरदान या पृथ्वीतलावर फक्त मनुष्यप्राण्याच्याच नशिबी आलंय, इतर प्राण्यांच्या नाही. म्हणून प्रत्येकाने ‘ग्रंथ हेच गुरु’ मानून वाचलंच पाहिजे. ज्ञानपिपासू बनणाऱ्याने ग्रंथउपासक बनले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, “तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या,कारण भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला का जगायचं ते शिकवेल”. गीतारहस्य,माझी जन्मठेप, डिस्कवरी ऑफ इंडिया,असे बहुतेक ग्रंथ हे जेलमध्ये लिहिले गेले.तेव्हा वाचनासाठी वेळ,काळ, प्रसंग गौण आहेत. दुसऱ्यांची पुस्तके वाचून IAS झालेले डॉक्टर राजेंद्र भारूड हे याचे उत्तम उदाहरण आहे. केवळ शाळेची पुस्तकं वाचनं म्हणजे शिक्षण नव्हे तर इतर अवांतर वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास होतो.खरं शिक्षण सुरू होतं ते शाळा संपल्यानंतरच.

म्हणूनच समर्थ सांगून गेलेत,”दिसामाजी काहीतरी लिहीत जावे,प्रसंगी अखंडित वाचीत जावे”.
परदेशात मुलांना लहानपणापासून वाचनाची सवय लावतात. वाचनालयात कम्प्युटर असतो.

त्याचा तुम्ही वापर करू शकता.आपल्याकडे हे चित्र दिसत नाही. आपण मोबाईल घेऊन बसलो की मुलंही आपलंच अनुकरण करतात.टीव्हीची स्क्रीन साइज इंचाइंचाने वाढत चालली आहे मात्र मेंदूची व विचारांची साइज वाढली पाहिजे त्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. जेव्हा देशात देवालयांच्या जागी पुस्तकालयं बनतील तेव्हाच खरी प्रगती होईल. वाचनाबद्दल आज लोक म्हणतात की,अहो आम्ही वाचतोच की,मोबाईल वर आलेले मेसेजस….पण कधीतरी पुस्तकातलंही वाचा.. डोकं शांत होईल..तो कोऱ्या पानांचा सुगंध मन भारून टाकेल.. अधिक वाचावसं वाटेल…पीडीएफ आणि ऑडिओ पेक्षा प्रत्यक्ष पुस्तकासोबत राहून वाचा… अधोरेखित कराव्याशा वाटतील काही ओळी… हायलाईट करावंसं वाटेल एखादं वचन..Tag आणि poke करण्यापेक्षा bookmark करावंसं वाटेल… अशक्त झालेला मेंदू सशक्त होईल… कल्पनेला धुमारे फुटतील चैत्रातील पालवीप्रमाणे…मृदगंध पसरेल रोमारोमांत आषाढातील पहिल्या पावसासारखा…ओढ लागेल नावीन्याची.. विचारचक्र गती घेईल… हात सळसळतील लेखणी धरण्यासाठी अन कागदावर उमटतील भावना शब्द बनून… आणि मिळेल तृप्तीचा आनंद…साधेल कृतार्थता…पण त्यासाठी उचलावं लागेल पुस्तक, उघडावं लागेल मस्तक.. थोडीशी धूळ झटकून स्वतःवरची अन पुस्तकावरचीही आणि विचारावं लागेल स्वतःलाच…पुस्तकासोबत केलेलं

The last seen…..

— प्रशांत रामभाऊ सुसर, बुलडाणा. 
23 एप्रिल 2022

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..