नवीन लेखन...

“आप”ली माध्यमे

The media and Aam Aadmi Party

आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी   प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा  एक प्रयत्न…


सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून चुकलाय, कधी कोणत्या घोषणा, कधी बतावण्या आणि काहीच नाही तर कधी वादळी वक्तव्य करून हे लोक चर्चेत माध्यमात राहतात. त्याचं प्रत्येक वाक्य किंबहुना त्याची प्रत्येक हालचाल हि ब्रेकिग न्यूज होऊन बसलीये. त्यामुळे देशातील इतर नागरिकांना आता काही प्रश्न नक्की पडत असतील कि, आपण भारतातच राहतो का? देशात दिल्ली सोडून दुसरी राज्य आहेत का? आपल्या देशात टीम केजरीवाल शिवाय इतर हि नेते आहेत का? आणि आप शिवाय दुसरे कोणते पक्ष आहेत का?

वास्तविक आपल्या भारत देशात २८ स्वतंत्र राज्ये आणि ७ गणराज्ये आहेत. ६ राष्ट्रीय आणि ४० प्रादेशिक पक्ष आहेत. याशिवाय कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा वापर न करता हि काही लोक आमदार आणि खासदार निवडून येतात. असे आपल्या भारतात एकूण २८ मुख्यमंत्री, ५४३ खासदार आणि ४२१५ आमदार आहेत. या सगळ्या मध्ये सध्या देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. हा पक्ष ज्या राज्यात निवडून आलाय त्या राज्याची एकूण लोकसंख्या आहे १६७५३२३५. विधानसभेची एकूण गणसंख्या आहे ७० आणि आम आदमी पार्टी चे एकूण आमदार आहेत फक्त २८. त्यांच्यापैकी फक्त ६ मंत्री आहेत आणि बाकी सदस्य आहेत. हि एवढी माहिती देण्याचे मुख्य कारण देशात दिल्ली सरकार च्या मंत्र्यानप्रमाणे देशभरात शेकडो मंत्री आहेत आणि हजारो आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सोडून देशात २७ मुख्यमंत्री आहेत. ज्यांच्या पैकी ३ मुख्यमंत्री असे आहेत जे अरविंद केजारीवाल यांच्या सोबत निवडून आले आहेत. आणि तेही बहुमताने, पण तरीहीदेशाची माध्यमे त्यांची चर्चा कुठेच करताना दिसलं नाहीयेत. पण दिल्ली सरकार पैकी कोणी शिंकल तरी त्याची ब्रेकिंग न्यूज केली जातीये. अस म्हणतात कि, माध्यमे कोणालाही नायक आणि खलनायक बनवू शकतात त्याचा प्रत्यय पूर्णतः सध्या आपल्या देशात येतोय. माध्यमांनी बनवलेला नायक म्हणजे दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी. माध्यमांच्या आपल्याला हवा तसा वापर करून घेण या लोकांना उत्तम जमलाय म्हणूनच कदाचित माध्यमांना देशभरात ४२१५ विधानसभा सदस्य न दिसता फक्त २८ च दिसत आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जन्माला आलेल्या या आम आदमी पार्टीचा जन्म मुळात कॉंग्रेसच्या भष्टाचारी राजवटी विरोधासाठी झाला. अण्णांनी आपले आंदोलन ज्या मुद्द्यावर केले, तोच मुद्दा उचलत आणि अण्णांशी फारकत घेत अरविंद केजरीवाल यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. कॉंग्रेस सरकार विरोधी वाढता जनक्षोभ आणि आणि सरकार ची भाष्टचाराची प्रकरणे याच्या विरोधी आंदोलने, मोर्चे काढून या पक्षाने आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवली. आधीच कॉंग्रेस च्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेला भाजपा हा उत्तम पर्याय समोर दिसत होता. दिल्ली च्या निवडणुकीतहि जनतेची प्रथम पसंती हि भाजपालाच होती. याचाच प्रत्यय म्हणून दिल्ली च्या जनतेने भाजपला सर्वाधिक पसंती देत ३२ जागांवर विजय मिळवून दिला. आणि आम आदमीला २८ जगावर म्हणजेच जनतेला सरकार हवे होते भाजपाचे. १५ वर्ष राज्य करणाऱ्या शीला दीक्षित यांच्या कॉंग्रेस पार्टीला फक्त ८ जागा मिळाल्या. भाजपा ने कोणाशीही युती न करता विरोधात बसने मान्य करत जनमताचा आदर राखला. पण आम आदमी पार्टीने सत्तेसाठी ज्या पक्षाच्या विरोधासाठी त्यांच्या जन्म झाला त्यांच्याशीच आघाडी करत जनतेची साफ फसवणूक केली. आणि आपल्या माध्यमांनी ह्या गोष्टीचा जाब विचारायचा सोडून आप चा उदोउदो चालू केला. ज्या कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न जनता करत होती त्याच कॉंग्रेस ला परत सत्तेत आणून आप ने जनतेची शुध्द फसवणूक केलीच, पण त्याहून जास्त फसवणूक आपल्या माध्यमांनी केली असा माझा स्पष्ट मत आहे. वास्तविक दिल्लीच्याच विधानसभा निवडणुकीच्या काळात राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छातीसगड याही राज्यांच्या निवडणुकी झाल्या. दिल्लीत जसे भाजपाला सर्वाधिक जनाधार मिळाला तसाच याही राज्यात मिळाला. लोकांची प्रथम पसंती भाजपालाच आहे हे हि स्पष्ट झाले. परंतु माध्यमांनी या गोष्टीला सोयीस्करपणे नजरेआड करत देशातील सर्वाधिक प्रामाणिक, सर्वाधिक जनाधाराचा पक्ष म्हणजे आपच अशा थाटात आपल्या बातम्या पुढे रेटल्या आणि त्या लोकांच्या मनात बिंबवत राहिल्या. देशात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घटनेला बगल देत माध्यमानी जनतेचे लक्ष फक्त आणि फक्त आप वर रोखायचा प्रयत्न करत. पक्षपाती पणाचा कळस केला. आपल्या देशातील वृत्त वाहिन्या कोणाच्या इशार्यावर चालतात हे जनतेला चांगलच कळायला लागलाय त्यामुळे कॉंग्रेसशी आघाडी हि वास्तवातील टीकेची झोड उठवणारी गोष्ट आप साठी मात्र सुप्रसिद्धीची सुवर्ण वाटच झाली.बर प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी कॉंग्रेसनेच शिकवलेले सगळे मार्ग हे लोक वापरू शकले. जसे साधे पणाचे नाटक करत शपथविधीसाठी केलेला मेट्रो प्रवास,(असा प्रवास सोनिया आणि राहुल गांधी यांनीही केला आहे फक्त लोकल मधून), लाल दिवा, सरकारी घर, सरकारी गाडी न वापरण्याच्या घोषणा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कॉंग्रेस च्या पायावर पाय देत केलेल्या पोकळ घोषणा दिल्ली च्या जनतेला अर्ध्या दारात वीज देणार, ७०० लिटर पाणी देणार, त्यामुळे देशभरातील जनतेचे लक्ष वेधण्याट हि माडली यशस्वी झाली खरी, पण त्यांच्याच सरकारने अशा अनेक घोषणा देशभरात या पूर्वीही करून ठेवल्यात पण अंमलबजावणी होताना कुठेही दिसला नाही. त्यामुळे आप च्या या घोषणांच्या मागे खरा आवाज कोणाचा हेही जनतेला लवकरच कळेल. किंबहुना कळायला सुरवात हि झालीये. सरकारीघरात राहणार नाही असे ठासून सांगणारे केजरीवाल १० खोल्यांच्या दुमजली घरामुळे जनतेसमोर खोटे सिध्द होताच आपल्याला नको मोठे घर सरकारी छोटे घर हि चालेल. असा म्हणून आपला बचाव करायचा केविलवाणा प्रयत्न हि या महाशयांनी केला. सरकारी गाड्या नाकारणाऱ्या आम आदमीच्या नेत्यांनी सरकारी गाड्या तर घेतल्याच वर आम्ही लाल दिवा नाकारला होता गाडी नाही असा खोटा बचाव हि केला. हे आणि अशी अनेक उदाहरण आहेत पुढेही मिळत राहतील. ते हे सगळ करतात या बद्दल काही तक्रार नाही कारण आधी सरकार विरोधी लढणारे आम आदमीचे कार्यकर्ते आता सरकार बनून खास झालेत. हे विसरून कस चालेल. आणि देशाला सवय झालीये सगळ्याची, गेली कित्येक दशके कॉंग्रेस तेच तर करत आलाय. आता फक्त मुखवटा आप चा असला आतला बोलविता धनी कॉंग्रेसच म्हणावा लागेल.

असो सांगण्याचा मुद्दा हाच कि, अशा खोट्या वागण्याने जनतेची फसवणूक होणार असेल तर देशातील माध्यमांनी जनतेला खरेपणा दाखवून देण त्यांचा काम आहे. बर सगळी माध्यमे अशीच आहेत असा माझा बिलकुल मत नाही. पण जी आहेत त्यांनी निदान आता तरी जनतेशी प्रामाणिक व्हाव असा माझा प्रामाणिक मत आहे. कारण आपल्या वृत्ताला भुलून जनतेने जर चुकीच्या पक्षाला मतदान केले तर त्याचे परिणाम पुढील ५ वर्ष देशाला सलग भोगावे लागतील आणि सद्याच्या जनतेला ते परवडणार नाही. त्यामुळे जे खरे नायक आहेत त्यांनाच नायक म्हणा ज्यांना तुम्ही नायक बनवताय त्यांची पात्रता तेवढी आहे का हा हि विचार करा. नाहीतर प्रशांत भूषण सारखे हुशार काश्मिर सारख्या संवेदनशील विषयात आपले निर्बुद्ध विचार व्यक्त करतात आणि आप च्या सवयी प्रमाणे पुन; चर्चेत येतात. पण हे होत असताना देशाच्या, देशातील नागरिकांच्या, सीमेवर दिवसाची रात्र करणाऱ्या आपल्या जवानांच्या भावना किती दुखावल्या जात असतील. त्यांच्या मनोधैर्यावर किती परिणाम होत असेल हा विचार नाही करत. आणि आपली माध्यमेही या गोष्टीचा निषेध न करता अशा वक्तव्या वर येणाऱ्या प्रतिक्रियान सर्वस्वी दोष देत बसता. पण प्रतिक्रिया म्हणजे घडून गेलेल्या क्रियेचा पडसाद असतात. त्यामुळे आपल्या जवाबदारी ला ओळखून देशाचे नुकसान तर होणार नाही न याची घ्यायला हवी. सध्या तरी आपल्या देशाची परिस्थिती अशी नाही कि कोणाला प्रयोग म्हणून देश सोपवावा. ज्यांनी स्वताला सिध्द केला आहे अशा आणि अशाच लोकांकडे देशाची सत्ता असावी असा एक सामान्य माणूस म्हणून माझा मत आहे.
बाकी समाजकारणासाठी जन्माला आलेल्या आप सारख्या पक्षाने सत्ताकारणासाठी कॉंग्रेस बरोबर मिळून केलेलं राजकारण कळण्या इतके आपल्या देशाचे नागरिक सुज्ञ नक्कीच आहेत…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..