…………. गावाकडची गोष्ट……….।
…हि सृष्टी निर्माण झाल्यापासून आकाश वरच असावे असे मला वाटते. या सुट्टी बद्दल व निसर्गाबद्दल अनेक माणसे वेगवेगळे सांगतात. नक्की काय इतिहास आहे हे कुणालाच माहीत नाही निसर्गातील किंवा सृष्टीतील अनेक वस्तू झाडे वेली फळे-फुले आपण नेहमी पाहतो. काही झाडांना हिरवा रंग काही फुले रंगीबेरंगी हा जो कलर आहे. त्या पेंटर चे नाव काय हे कुणालाच माहीत नाही अर्थात मला सुद्धा परंतु जे डोळ्यासमोर दिसते याठिकाणी मात्र वास्तव वाद निर्माण होतो. अनेक लेखक कवी निसर्गाची नेहमी दोस्ती करतात कारण निसर्गाचे वातावरण लेखनास पोषक असे असते. तर काही जण म्हणतात केंद्र काळे हे ग्रह आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये चंद्र आणि सूर्याला देव मानले आहे. मी आमच्या राणा मध्ये असताना निसर्गाच्या सानिध्यात बरेच काही लेखन केले. परंतु निसर्गाची देणगी फार मोठी आहे त्याची गणता करता येत नाही कारण हे निसर्गाला लाभलेलि.
फार मोठी देणगी आहे असे मला वाटते निसर्ग क्रमाक्रमाने बदलत असतो त्याच प्रमाणे हवा सुद्धा बदलत असते. कधी ऊन, कधी पावसाळा, तर कधी हिवाळा हे ऋतू येतच असतात याची रुकावट मानवाला करता येत नाही. कारण मानव हा निव्वळ पोपटपंची असा आहे म्हणूनच इतर मित्रापेक्षा निसर्गाशी मैत्री व सलगी मला बरी वाटते. निसर्ग बोलत नाही पण मानवाला खूप काही देऊन जातो मित्र नातेवाईक भेटतात थोडीशी मैत्री करतात. काही दिवस चांगले बोलतात मध्यंतर शब्दा शब्दा मध्ये वितांड तांडव निर्माण झाली म्हणजे मैत्री मध्ये किंवा नातेवाईकांमध्ये थोडीफार दुश्मनी निर्माण होते. तसं निसर्गामध्ये नाही आत्तापर्यंत योगी माणसं माणसांच्या पासून दूर जाऊन परमेश्वराची साधना करतात. ही मंडळी मानवा पासून लांब दूर अशा निर्जन ठिकाणी वास्तव्यास असतात कारण भक्तीमध्ये वाईट माणसांचा वारा त्यांना नको असतो. म्हणूनच ही मंडळी मानव प्राण्यापासून लाब असते निसर्ग कधी स्वार्थी नसतो पण मानव हा फार स्वार्थी असतो. जगापुढे पाच पैसे टाकून त्याला मिदे करू पाहतो आणि त्याच्याकडून स्वतःचा फायदा करून घेतो हे सध्याचं चित्र दिसून येते. राजकारण घ्या समाजकारण घ्या किंवा साहित्य कला घ्या. यामध्ये ज्ञान नाचणारी माणसं घुसखोरी करून मीफार शहाणा आहे असे समाजाला दाखवून देतात. पण निसर्ग असे कधी दाखवत नाही निसर्गाची दृष्टी समसमान अशी आहे. पण काही मानवांची दृष्टी बरोबर नाही अशी कितीतरी या जगामध्ये माणसे वावरत आहेत. मी या जगामध्ये का आलो काय केलं पाहिजे कसं राहिलो पाहिजे हे विसरून नको त्या भानगडी मध्ये स्वतःचा वेळ घालवत आहे. अशी करून सुद्धा ही मंडळी समाधानी मुळातच नुसते स्वार्थाने पेटलेली माणसं यांचं गणित समंजस माणसाला लवकर समजत नाही हीच मोठी खंत आहे….।
…. मी शेतामध्ये राहिला असताना आजीला नेहमी म्हणायचो आजी चंद्र रोज वर आहे तो खाली कधी येणार. आजी म्हणायची आता तो येणार नाही चंद्राला सुद्धा माणसांचा राग येतो..।
,,, पण का मी म्हणालो..।
,,, सर्वात या जगामध्ये काय वाईट असे ल सांग पाहू आजी म्हणाली…।
,,, सर्वात घाण मला वाटते गटारी तील पाणी सर्वात घाण आहे मी म्हणालो..।
,,, म्हणजे चांगली किंवा वाईट हे तुला समजते तर..।
,, होय मला सारे समजते कारण तू व माझ्या आईने मला शिकवले आहे ना…।
,,, परंतु मी म्हणते आजी म्हणाली..।
,,, काय…।
,,, गटारी तील पाण्यापेक्षा माणसाचा स्वभाव अतिशय घाण असा आहे. मग अशा माणसासोबत चंद्र राहील का तो फक्त जगाची राखण करतो. मग माणूस या ठिकाणी कोण झाला बरे आजी म्हणाली….।
,,, चंद्रसूर्य संपूर्ण माणसाची देखभाल करतो निसर्गाचे संगोपन करतो म्हणजे तो शिपाई झाला की काय मी म्हणालो…।
,,, देव हा गरीबांचा कैवारी तर जगाचा गारुडी आहे निसर्गाला फक्त माणसे जगवायचे काम आहे तरीसुद्धा मानव प्राण्यांमध्ये सुधारणा नाही. आजी म्हणाली…।
.. मी आजीचा पूर्णपणे संवाद ऐकत होतो व आजी मधेच म्हणाली.
,,,, एक बाई स्वतःचा अंगण लोटत होती खाली आलेले आकाश त्या बाईला एकसारखेथटत होते. म्हणून तिने रागारागाने हातातील खराटा आकाशाला मारला. तेव्हापासून हे आकाश वर गेले आहे हे ऐकून मला थोडे हसू आले आणि आजी म्हणाली हसण्यासारखे च आहे तेव्हापासून हा चंद्र वर आहे. अशा गोष्टीतून नक्की काय घ्यायचं हा प्रश्न मला पडत असे कारण वयस्कर माणसे लबाड बोलत नसतात. एखाद्या वेळी तसे सुद्धा असेल बाईने हातात खराटा घेऊन आकाशाला मारले हे मी पाहिले नाही तरी परंतु त्या दिवशी मी रात्री चंद्राकडे एक सारखा पाहत होतो. चंद्राभोवती असंख्य चांदण्या उघडझाप करत होत्या हा रात्रीचा देखावा माझ्या डोळ्याला मनमोहक असा वाटत होता. अशा चांदण्या मध्ये व चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये एकांदी.टिटवी ओरडा वी आणि आवाजामध्ये व वातावरणामध्ये भेसूरता निर्माण करावी तसेच सुद्धा माझ्या मनाला वाटत होते पण त्या रात्री राहुन राहुन मी त्या चंद्राकडे एकटक पहात होतो. आंब्याच्या झाडाखाली झाडाच्या फांदीतुन डोकावणारा चंद्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाही हेच खरे…।
….। पूर्णविराम।….
–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे (उर्फदतामा….….।)
Leave a Reply