जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर यांचा जन्म ७ ऑगस्ट १८७६ रोजी नेदरलँड्स मध्ये झाला.
गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं. या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं!
जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!
माता हारी हे त्यांच टोपण नाव. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले. माता हारी यांचा जन्म नेदरलँड्स मध्ये.झाला. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. त्यांचे सौदर्य आणि अदाकारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या. माता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.
आपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते.
“माता हरी” या जर्मन सेनेकडून काम करायच्या. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात आपल्या मादक नृत्याने शत्रूसेनेतील अनेक ऑफिसर्सना भुलवून, त्यांच्याशी जवळीक निर्माण करून अत्यंत गौप्यनीय माहित गोळा करण्याचे काम माता हरी यांनी केले. प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि जर्मन सेनेला पुरवायच्या.
माता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला. याच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.
माता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य! नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले. फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहित्य पुरवतात या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हतें, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये १५ ऑक्टोबर १९१७ रोजी माता हारी यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply