नवीन लेखन...

आध्यात्माची आवश्यकता

परमेश्वरावर श्रध्दा ठेवून, स्वत:च्या मनावर ताबा ठेवून, क्षणिक शारीरीक सुखाचा त्याग करूनकामवासनेचा नाश आणि आध्यात्मिक सेवेचा प्रकाश नित्य मनात असावा. कधीही यशाला भारावून न जाता अथवाअपयशाला न डळमळता, यशाच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होऊन पुन्हा कधीही अपयश न येण्यासाठी उठता-बसता, जागता-झोपता, चालता-बोलता, सुखात -दु:खात इतकेच काय परंतु स्वप्नात सुध्दा नित्य नियमितपणे खंड पडू न देता, अखंडतेनेपरमेश्वराचा धावा करावा. त्याच्या चरीत्राचे गुणगाण करावे. घरात-दारात, प्रवासात, प्रत्येक कामात जो भेटेल त्यालाईश्वर नामाचा उपदेश करून दु:ख मुक्त करण्याचा प्रयत्न आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत करावा. ऐहिक सुखदु:खात न गुंतता, फक्त पारलौकिक कल्याणाचा, आत्मानंदाचा विचार करून, या मानवी शरीराला शोभून दिसणारेव चंद्र-सूर्याच्या अस्तित्वापर्यंत किर्ती  पसरविणारे कर्म करावे. इतर विषय वासना व विकारात, व्यसनात आणिविनाशकारी संसारात न गुरफटता मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी संसाराचा एक सिडी म्हणून वापर करावा. तरचमोक्षाचा मजला गाठता येईल. वर्तमान काळात, सद्य स्थितीत याची फार आवश्यकता आहे.

साधक शब्दाचा अर्थ फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करणे अथवा नित्य मंदिरात जाणे, दर्शन घेणे, पुजा,पाठ, आरती करणे एवढाच मर्यादित नसून तो खुप व्यापक आहे. साधक म्हणजे आकाशाप्रमाणे विशाल,वाऱ्याप्रमाणे सर्वव्यापक, सृष्टि प्रमाणे सुंदर, चंद्राप्रमाणे शितल, पाण्याप्रमाणे स्वच्छ, सूर्याप्रमाणे तेजस्वी आणिअग्निप्रमाणे सर्वनाशी (विकृत्तीचा नाश करणारा) इ. गुणांचे प्रसंगानुरूप शिक्षण देऊन, त्यानुसार चालण्याची शक्ती,उर्जा व आंतरीक सामर्थ्य देणारा आहे. साधक आकाशाप्रमाणे सर्वाना सामावून घेणारा असवा. वाऱ्याप्रमाणे सुखअथवा दु:खात सतत सोबत राहणारा असावा. सृष्टिप्रमाणे ईश्वराचे सौंदर्य दाखवणारा असावा. चंद्राप्रमाणे साक्षातयमासमोर ही शीतल व निश्चल राहणारा असावा. पाण्याप्रमाणे आचरण शुध्द करणारा असावा. सूर्याप्रमाणेचारित्र्याचे तेज निर्माण करणारा तर अग्निप्रमाणे स्वत:च्या परिपुर्णतेने समाजातील दुर्गुंणांचा सर्वनाश करणाराअसावा. साधक हा अवर्णनिय, अद्वितिय आणि आत्मशक्ती जागृत करणारा असावा.

विश्वाची घडी व्यवस्थितपणे चालवणारा परमेश्वर हा सेवा, श्रध्दा, कतृत्व व आराधना याने आपल्यालाजवळ करतो.  सेवा म्हणजे समाज हित जोपासणे, श्रध्दा म्हणजे साध्यावरची निष्ठा व एकाग्रता होय. कतृत्व म्हणजेसाध्य प्राप्तीसाठी घेतलेली मेहनत किंवा परिश्रम होत, तर आराधना किंवा भक्ती  परमेश्वराची केलेली आळवणी होय. या भक्तीनेच मोक्षाचे महाद्वार उघडते. स्वत:चे निश्चित असे स्थान सांगण्यासाठी व प्रतिष्ठेसाठी घर असते.स्वत:च्या अब्रुसाठी व वेगळेपणासाठी कपडे असतात, समाजात वावरण्यासाठी शिक्षण असते. शरीर रक्षणासाठीअन्न आणि पाणी असते. अगदि तशाच प्रकारे या सदैव भटकंती करणाऱ्या अस्थिर, अजर-अमर अशा आत्म्यालास्थिर करण्यासाठी व मोक्षाच्या घरात स्थानापन्न करण्यासाठी आध्यात्माची फार आवश्यकता आहे.

अशा प्रकारे आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो. हा फरक फक्त आध्यात्माच्या अंगिकाराचा व ईश्वर चिंतनाच्या सहवासाचा आहे. ही कायम जाणीव मनात ठेवून परमेश्वराची आराधना निस्वार्थी भावनेने करावी. सुदामाने निस्वार्थपणाने सेवा करून कुबेराचे वैभव मिळवले मग आपण का बरे नाही मिळवू शकत ?

— सुनिल कनले 

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..