पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे.
संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . शुभंकरोती कल्याणं ….म्हणणे आणि त्या नंतर रामरक्षा हे नित्योपचार असायचे .
रामरक्षा अत्यंत गुणकारी असून घरात सौख्य , आरोग्य , आणि ऐश्वर्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्रा मध्ये जी ताकद आहे तेव्हडीच ताकद या स्तोत्रात आहे.ज्या घरात हे स्तोत्र लहान मुलांना शिकवले जाते त्या घरात सदैव नितीमत्ता आणि त्यातून येणारे धैर्य घरातील लोकांमध्ये वास करून असते .हल्ली मुले रामरक्षा म्हणत नाहीत . ती पुन्हा परत म्हणणे सुरु करणे हि काळाची गरज आहे.सोबत एक यु ट्यूब ची लिंक दिलेली आहे. रामरक्षा कशी म्हणावी हे ती लिंक उघडल्यावर कळेल !!!
श्री राम ….
–चिंतामणी कारखानीस
नमस्कार.
रामरक्षेवरील आपला लेख वाचला. खरें आहे, मीही अशीव लहानपणीं रामरक्षा शिकलो. आतां या सर्वांची जागा टी. व्ही. सीरीयल्स नसीघेतली आहे, जी आबालवृद्ध चवीनें पहातात, तासन् तास. असो.
मी स्वत: रामरक्षेचें २ प्रकारें मराठीत पद्य भाषांतर केलेलें आहे, व तें प्रकाशितही झालेलें आहे. १. समश्लोकी भाषांतर . २. सरल रूपांतर. त्याला संस्कृत-पाली-हिंदी-मराठी व इंग्रजी भाषेचे पंडित, आणि, महाकवी मोरोपंतर यांचे वंशज डॉ. मो. दि. पराडकर यांचा पुरस्कार ( प्रास्ताविक) लाभला, हें माझें भाग्य.
ते माझ्या भाषांतराचें पुस्तक, पुण्याला केसरी वाड्याजवळील समर्थ ग्रंथ भांडार येथें मिळतें.
आतां, आपला लेख वाचल्यानंतर, लवकरच ती माझें भाषांतर मराठी सृष्टीच्या व माझ्या स्वत:च्या बेब-साइटवर अपलोड करेन .
स्नेहादरपूर्वक
सुभाष स. नाईक.
सांताक्रूझ , मुंबई