घामणगांव ( जिल्हा –अचलपूर-महाराष्ट्र) येथे २५० वर्ष जूनी गढी (मातीचा किल्ला) आहे. या गढीची माती सिमेंटपेक्षा उत्तम काम देते.
३५ वर्षांपूर्वी दगड व ही माती वापरून बांधलेल्या गांवातील विहिरी अजूनही इतक्या मजबून आहेत की छिन्नी हतोडयाने फुटत नाही. अशी ही माती, स्थानिक माती, शेण, बेलफळ, तागाचे तंतु व चूना इत्यादि घालून २८ दिवस तुडवून, रोज थोडे थोडे पाणी वाढवून, बनवित असत. जस जसे दिवस जातील तसतशी ही माती दगडासारखी कठोर होत जाते. आधुनिक शास्त्रात याला मृदा स्थिरीकरण (सॉइल स्टॅबिलाइझेशन) म्हणतात.
या गढीला २५० वर्षांचा इतिहास आहे. परकोट इतका रुंद आहे की एक बैलगाडी त्यावर चालु शकेल. गढीच्या भिंतीत हत्ती बसतील असे कोनाडे आहेत. गेले कांही वर्षे पर्यंत फाटकर कुटुंब वंशपरंपरागत या गढीची देखरेख करत असत. आता त्यांचे वंशज गांवातच राहतात. आता ही गढी भग्नावस्थेत आहे. गढी भोवतालचा खटक केव्हाच बुजला आहे. एक टेहळणी बुरुज तेवढा शिल्ल्क आहे.
गढीची पांढुरकी माती बांधकामास फार उपयुक्त असल्याने एक रुपयाला बैलगाडीभर माती या दराने आसपासच्या गावातले लोक विकत घेत असत. आता तो दर १२ रुपये असा आहे. पुण्याजवळील शिरूर गावांत प्रचंड मोठी घान्य कोठारे अशाच पध्दतीने बनवली गेली आहेत. यावर संशोधन होण्याची गरज आहे.
— प्रा. अशोक नेने
भ्रमण ध्वनी 8329509522
Leave a Reply