नवीन लेखन...

एका भारतीय सेल्समनची गोष्ट

The story of an Indian Salesman

एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली.

दुसर्‍या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले.

मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला.

मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील असा विचार मालकाने केला.

तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर !

क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच !

बाकीचे सेल्समनही अचंबित झाले।

मालक म्हणाले काय विकलेस तू त्याला ?

तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला.

पण त्याचे एवढे पैसे कसे? मालकाची शंका.

मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यायुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहावं लागेल म्हणून पुरेल एवते खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर !

एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते, मालक म्हणाले कसला माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस!

तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता, मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा, आणि हे सर्व घडून आले,

मालक म्हणाले आजपास्नं तू माझ्या खुर्चीत बस बाबा! गुरु आहेस तू. कुठे काम करत होतास भारतात!

तो म्हणाला सर, एल आय सी एजंट होतो !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..