कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.
खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.
लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye’s syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.
हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.
त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.
ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.
कांजिण्यांपासून बचाव.
वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).
लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवास करणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.
ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.
वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचा वापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.
वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.
हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे
.कांजण्यासाठी
कडुनिंबाची २०० Gm पान +
मिरे 5 gm एकत्र करुन वाटुन चण्या एवढ्या गोळ्या करा
1 गोळी 1 कप दुध
( ७ दिवस)
@ १ चमचा कडुनिंबाचा रस +
४ चमचे खडीसाखर
@ घरातल्या दारात कडुनिंबाची पाने बांधुन ठेवा
@ कुडुनिंबाच्या पानाचा बिस्तरा बनवा वर सफेद चादर किंवा कापड टाकून त्याच्या वर आजारी व्यक्ती ला झोपवा
प्रसारणःराजयोग ग्रुपचे
— आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने
Leave a Reply