नवीन लेखन...

संस्थेच्या पदाधिकारी यांची सहकार वर्ष अखेरची वैधानिक कामे

कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते. सहकार वर्ष हे ३१ मार्चला संपते. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीत संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलावणे कायद्याने बंधनकारक असते. परंतु पुढील महिन्यापासून करावयाची वैधानिक कामे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्यास इतर संस्थेत आनंदी आनंद असतो. पदाधीकार्‍याकडे कारणाची न संपणारी यादी असते. परंतु योग्यप्रकारे वेळीच काम केले तर भविष्यात आपला मौल्यवान वेळ वाचण्यास नक्कीच मदत होईल.

१) खर्च केलेल्या रकमांची प्रमाणके (व्हाउचर्स) योग्यप्रकारे स्वीकृत केली आहेत याची तपासणी करणे.

२) ३१ मार्च रोजी कॅश बुक आणि हाती काही शिल्लक असल्यास ती रक्कम तपासून पाहणे.

३) सदस्यत्वाचा अर्जासोबत प्रवेश फी आणि हस्तांतरण फी बरोबर घेतली आहे का ते तपासणे.

४) इतिवृत्त सर्व सभांचे योग्य प्रकारे नमूद केले आहेत का ते तपासणे.

५) बँकेचे संस्थेचे पासबुकमध्ये इंटरेस्टची नोद बरोबर झाली आहे हे पाहणे.

६) ३१ मार्च रोजी मुदत ठेव असलेल्या पावत्या संस्थेच्या ताब्यात असल्याची पाहणी करणे.

७) वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना देण्यात यावा. बऱ्याच संस्थेत अहवाल सदस्यांना दिला जात नाही.

८) ३१ मार्च रोजी कसुरदार सदस्याचे खाते आणि मासिक बिल मधील रक्कम बरोबर आहे का ते पाहणे.

९) कसुरदार सदस्यास मुद्दल आणि व्याज याची माहिती द्यावी. व्याज चक्रवाढ (Compound) नसावा.

१०) सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संस्थेच्या वतीने देऊन सदर पत्रव्यवहाराची स्वतंत्र फाईल बनवली आहे की नाही हे पाहणे. या बाबींचे पालन केल्यास बरेचसे वाद कमी करण्यास संस्थेस मदत होईल. पदाधिकारी हे लोकांनी निवडून देलेले सदस्य असतात. वाद उद्भवल्यास वेळीच कायदेतज्ञ यांचा सल्ला सदस्यांनी तसेच पदाधिकारी यांनी घेतल्यास, सहकार संस्थेत जास्तीत जास्त असहकार दिसतो असे म्हणावे लागणार नाही.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..