मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !!
कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर स्वताला गहाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं..!
अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!
“ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त “आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय”…या एकाच तत्वावर. “!!
ज्याचा कितीही विश्वासघात झाला,अपमान पदरी आला, फसवणूक झाली तरी हारण्याच्या,मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही.!!
ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो “साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं!!” और हटनेका भी नहीं !!
पण कसं आहे, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात.
“ठेच!” एक अनुभव…जीवनाचा एक अध्याय…एकाची समाप् ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ.!!
त्यातूनच तर माणूस शिकत असतो. ….. जीवनाचं शहाणपण…..
Leave a Reply