सशक्त राष्ट्र चांगल्या नागरिकांच्या मुळे बनते ….
चांगले नागरिक तेच होऊ शकतात ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाण असते, राष्ट्रातील इतर नागरिकांच्या आणि नागरिकांच्या समूहाच्या भावना योग्य तर्हेने समजू शकतात ….
सामाजिक प्रश्नांची जाण शाळेत निर्माण करता येत नाही तर त्याचे माध्यम आहे वाङ्मय ….
वाङ्मय निर्मिती आणि वाचन हे राष्ट्र निर्मिती चे महत्वाचे साधन आहे …..
जे वाङ्मय वाचले जाते आणि त्याचा रसास्वाद केला जातो त्यानुसार व्यक्तीचे भावविश्व् निर्माण होते ….
कोणत्याही वाङ्मयात त्याच्या लेखकाच्या संस्कृतीचे आणि प्रदेशाचे भावविश्व् असते ….
एखाद्या राष्ट्रात चांगले नागरिक निर्माण करायचे असतील तर त्या प्रदेशात स्थानिक वाङ्मय निर्मिती आणि त्याचे वाचन होणे गरजेचे आहे ….
वाङ्मयाचे माध्यम आहे भाषा …
तर मंडळी विचार करा ….
१. इंग्रजी मध्ये किंवा इतर कोणत्याही अस्थानिक भाषेमधील वाङ्मय वाचून चांगले नागरिक निर्माण होऊ शकतील का ??
२. अस्थानिक, पुराणकालीन भाषांमध्ये स्थानिक प्रश्नांचे, समस्यांचे, भावनांचे प्रतिबिंब योग्य तर्हेने दिसेल का ??
३. पुराणकालीन भाषा वापरून राष्ट्र निर्माण होऊ शकते का ??
४. चांगले राष्ट्र निर्मिती साठी स्थानिक भाषा माध्यम म्हणून अनिवार्य करायला नको का ??
५. अस्थानिक किंवा पुराणकालीन भाषेला प्राधान्य देणाऱ्यांना देशभक्त म्हणता येईल का ??
६. अस्थानिक लोक जे अस्थानिक भाषेचा आग्रह धरतात त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे असे म्हणता येईल का ??
७. Cosmopolitan संस्कृती चांगले नागरिक निर्माण करू शकेल का ??
८. कॉस्मोपॉलिटन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांना देशभक्त म्हणता येईल का ??
९. ………
मला उत्तरे नको आहेत …… कारण ती स्पष्ट आहेत ……
मला थोडक्यात सांगायचे आहे ……
अनेक भाषिक समूह किंवा प्रदेश हा धर्म, संस्कृती किंवा राज्यघटनेने जोडला असला तरी त्याचे राष्ट्र होत नाही ….
असे प्रतिपादन करणारे जे कोणी आहेत त्यांचे डोके किंवा उद्देश तपासायलाच हवेत …..
भारतात आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती चूकीची तत्वे अंमलात आणल्याने आहे ……
This is by design ??? or By mistake ???? need to investigate ….
— मिलिंद कोतवाल
ठाणे
Leave a Reply