काल माझ्या “शीघ्रकाव्य” नावाच्या ग्रुपमध्ये मी “आठवण” हा शब्द दिला होता. त्यासाठी मी केलेली एक चारोळी. हाच विषय घेऊन मी कविता पुढे केली आहे. पहिल्या चार ओळी हीच चारोळी आहे.
ठेवणीतल्या आठवणींचे,
करावे तरी काय,
किती वण ठेवून जाती,
आठवांचे काय जाय–?
स्मृतींच्या इंगळ्या डंसता,
भूतकाळाचे मोहोळ फुटते,
असेच त्याचे वर्चस्व सारे,
तनी मनी येऊन बसते,–!!!
जिवाची होते तगमग,
नि प्रचंड अस्वस्थता येई,
वर्तमानी राहूनही,
जगणे, अवघड होई,–!!!
कित्येक स्मृतींना गंध असे, कुपीतील अत्तरासारखा,
हृदय कुपीतून अत्तर सांडे, घमघमाट साऱ्या घरा,–!!!
होता नकळत दुःखाची स्मरणे,
जीव कासावीस होतो,
त्यावेळचे आपण तेच का,
आज प्रश्न सारखा पडतो,–!!!
सिंहावलोकनी उत्तरे नसती,
चुका घडून गेल्या,
दुरुस्ती नसे त्यांना आजही,
जखमा ठणकत राहिल्या,–!!!
रडावे मोकळे ज्यांच्यापाशी,
अशी नातीही ना राहिली,
पूज्य वाटावी अशी व्यक्ती,
विरळाच दिसून राहिली,–!!!
कोपऱ्यात मनाच्या कुठेतरी, स्मरणांची चालते उलघाल,
जीव शिव शरिरी नाही,
अशी त्यांची वाटचाल ,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply