जून महिन्यांतील तिसरा रविवार पितृ दिन (फादर्स डे) म्हणून साजरा केला जातो! वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस!
गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
मुळात बाबा, वडील या शब्दांऐवजी ‘फादर’ वगैरे म्हणायला आपली जीभच लवकर तयार होत नाही. प्रत्येकाच्या जीवनात आई इतके बाबासुद्धा महत्त्वाचे असतात. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करतोय याची पुसटशी जाणीवही बाबा त्यांच्या चेहऱ्यावर कधी येऊ देतं नाहीत. घरामध्ये शिस्त टिकवण्यासाठी प्रसंगी बाबा कठोर होतात पण त्यांच्याशी असलेलं नात हे मैत्रीच्या नात्यासारखं आहे.
पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. सार्यांसना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसर्यासच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं. कितीही गरीब, श्रीमंत वडील असो, तो आपल्या कमाईतला जास्त हिस्सा पत्नी, मुले, कुटुंब यांच्यावरच खर्च करतो. मला जे मिळालं नाही, त्यापेक्षा कितीतरी भरभरून परिवारातील सदस्यांना मिळावं या करिता अहोरात्र त्याची धडपड चाललेली असते. केवळ झिजत राहणं, हेच त्याचं ब्रीद असावं का?
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply