MENU
नवीन लेखन...

मुंबईवरील दहशतवादी हल्याची तेरा वर्षे

२६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबई वरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. प्रत्येक वेळी जेव्हा या हल्ल्याचा उल्लेख होतो तेव्हा अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणींसोबतच नवीन माहितीचीही भर पडत असते. समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी २६ ते २८ नोव्हेंबर २००८ या तीन दिवसांत मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांवर घडवलेला नरसंहार स्मृतिपटलाच्या आड कधीही करता येणार नाही.

२६ नोव्हेंबरचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. तसेच मुंबई पोलिस दलातील १४ पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. अशोक कामटे, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, विजय साळस्कर, तुकाराम ओंबळे, बापूराव धुरगुडे, जयवंत पाटील हे शहिद झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.

या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर अधिकाऱ्यांना, पोलीसांना,आणि या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांना भावपूर्ण आदरांजली.

त्या दिवसांतील आठवणींना उजाळा देणारी अनेक पुस्तके गेल्या सहा वर्षांत प्रकाशित झाली आहेत.

‘हेडली आणि मी’ – राहुल भट- एस. हुसेन झैदी, अनुवाद – अभय सदावर्ते,

‘ऑपरेशन एक्स’ – प्रज्ञा जांभेकर-चव्हाण,

‘ते चौदा तास’ – अंकुर चावला, अनुवाद- मृणालिनी नानिवडेकर,

‘टू द लास्ट बुलेट’ विनिता कामटे

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..