जन्म: १९ डिसेंबर १९३४
भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे.
कार्यकाळ: २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७
भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५. रोजी पश्चिम बंगाल राज्यातील विरभूम जिल्ह्यातील क़िरनाहर शहरापासून काही अंतरावर असलेल्या मिराती गावात झाला. त्यांचे वडील १९२० सालापासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते व स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी ब्रिटिशांविरोधात पुकारलेल्या बंडामुळे त्यांना कारावासही झाला होता. या सोबतच त्यांनी १९५२ ते १९६४ या कालावधीत पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्य तसेच विरभूम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली. प्रणव मुखर्जी यांचे शिक्षण सुरी येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले. कोलकाता विश्वविद्यालयात त्यांनी पदवी प्राप्त केली. | त्यांनी सुरुवातीच्या काळात वकिलीसह प्राध्यापक आणि पत्रकार म्हणूनही काम पाहिले. त्यांना मानाची डि. लिट ही पदवीदेखील बहाल करण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी अखिल भारतीय काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेता म्हणून परिचित आहेत. नेहरू आणि गांधी परिवारासोबत त्यांचे जवळचे संबध आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पी. ए. संगमा यांचा पराभव केला. २५ जुलै २०१२ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. ते बंगीय साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि अखिल भारत बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षदेखील होते. १९६९ साली राज्यसभा सदस्याच्या रूपात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला. १९७३ साली औद्योगिक विकास विभागाचे केंद्रीयमंत्री म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
Leave a Reply