नवीन लेखन...

थोड जगलं पाहिजे

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

गजर तर रोजचीच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
“फुलपाखराच्या” सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।

आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
‘बातम्या नको,कार्टून लावा’
असा आमचा गलका असे

बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
‘खेळून झाल्यावर अभ्यास’
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला ‘वळण’ लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच ‘बाक’ येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
‘परीक्षा’ हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whatsapp chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले || ६

आयुष्य काय असते पहा…

चालता बोलता आपल्यातून कोण कधी निघून जाईल याचा काही नेम नाही.जायचे तर सर्वानाच आहे.कोणी आधी जाणार कोणी नंतर .मग या एवढ्याश्या आयुष्यात आपण सर्वांशी प्रेमाने राहू शकत नसू तर या जगण्यात काय अर्थआहे.माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की आपल्या माणसांना कधीच दुखऊ नका ,कोण केंव्हा आपली साथ सोडून जाईल किवा आपण कोणत्या क्षणी या जगाचा निरोप घेऊ याची शाश्वती नाही म्हणून आनंदाने रहा व सर्वाना भरभरून प्रेम द्या , सर्वांच्या मदतीसाठी कायम उभे रहा.

— WhatsApp Forward

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..