<ती अशीच
<ती अशीच अचानक भेटली
<तिचं नाव काय... गाव काय
<काही काही माहित नव्हतं
<उगीच थबकायची
<चाहूल घ्यायची
<काहीही न बोलता
<निघून जायची
<गर्दीत मिसळून
<लपंडाव मांडायची
<स्वतःच रुसून
<स्वतःशीच भांडायची
<कधी म्हणाली होती
<' <ये चार फुले घेऊन
<भेटायला मला
<माझाच गंध होऊन< '
<काय ते तिचं तिलाच माहित
<मुक्यानंच बोलायची खूप
<सांजेच्या क्षितीजासारखा
<असायचा तिचा हुरूप
<कधी भिजल्या डोळ्यांची
<... उभी सामोरी
<कधी वळून पाहणारी
<...हळवी ... पाठमोरी
<कधी अधीर अधीर
<ओथंबल्या घानांसारखी
<तर कधी पावसानंतरच्या
<... निःशब्द मनासारखी
<गंधित मध्यरात्रीसारखं
<बेनाम एक नातं
<काळजाचा खोपा करून
<कसं तिने जपलं होतं
<....काही<काही<माहित<नव्हतं
<तिचं<नाव<काय< ... <गाव<काय
<काही<काही<माहित<नव्हतं
<ती<अशीच<अचानक<भेटली
<ती<अशीच<अचानक<भेटली
< <- <गजानन<मुळे
< mulegajanan57@gmail.com
ती अशीच
ती अशीच अचानक भेटली
तिचं नाव काय… गाव काय
काही काही माहित नव्हतं
— गजानन मुळे
Leave a Reply